राजेंद्र पाटील राऊत
विजयवाडी गावात लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान करून महिलांनी साजरी केली आगळी-वेगळी वटपौर्णिमा………..
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
आज विजयवाडी येथे लोकनेते स्व.प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील साहेब यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ.तेजश्री संजय लावंड,आमच्या गूरूवर्य जिल्हा परिषद शिक्षिका सौ.शिवाली लावंड-देशमुख मॅडम,शिक्षिका सौ.सुप्रिया सागर लावंड,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.शशिकला बद्ये यांच्या कन्या सौ.गौरी सूरज जाधव यांनी रक्तदान करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला व आज वटपौर्णिमा हा सण रक्तदान करून आपल्या सौभाग्याप्रती असणारे प्रेम दाखवून दिले.
कोरोना सारख्या महाभयंकर संकटात गावात खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला असताना सुध्दा गावातील सुजाण नागरिकांनी 51लोकांचे रक्तदान करून समाजाप्रती असलेली दात्रूत्वची भावना दाखऊन दिली.जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल जनसेवा संघटना त्यांचे शत:शह ऋणी राहील.रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांस प्रोत्साहनपर भेटवस्तूही देण्यात आल्या..यावेळी विजयवाडी गावातील सर्व जनसेवा संघटनाचे पदाधिकारी माजी सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.