• Home
  • मुखेड तालुक्यातील निवळी शिवारात ऑटो अपघातात एक ठार तर आठजन जखमी..

मुखेड तालुक्यातील निवळी शिवारात ऑटो अपघातात एक ठार तर आठजन जखमी..


मुखेड तालुक्यातील निवळी शिवारात ऑटो अपघातात एक ठार तर आठजन जखमी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारात विठ्ठल मंदिरजवळ क्रेन व ऑटो रिक्षा च्या अपघातात एक महिला ठार तर आठ महिला गंभीर जखमी झाल्याची घटना 24 मार्च रोजी दुपारी तीन वाजता घडली. नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून संपूर्ण लॉकडाऊन असल्याने डोरनाळी व वडगाव येथील महिला बाजार खरेदीसाठी बाराहळीला आले होते. आपला बाजार आटोपून परत गावाकडे ऑटो क्रमांक टी एस 16 यु ए 17 23 जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील निवळी शिवारातील विठ्ठल मंदिराजवळ अजयदीप कंट्रक्शनच्या कामावरील क्रेन क्रमांक एम एच 34 एल 8294 बाराहाळीकडे येत असताना क्रेनचालक प्रदीप भरत देशमुख वय 27 वर्ष रा. घोडकी ता.वाशी जिल्हा उस्मानाबाद यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून ऑटोस जोराची धडक दिली. त्यात ऑटो 10 ते 15 फूट खोल खड्ड्यात पडला. यामध्ये ऑटोमधील राधाबाई शंकर बिरादार वय 60 वर्ष राहणार वडगाव ता. मुखेड ही महिला जागीच ठार झाली. अपघातात सुरेखा यादव घंटेवाड वय 35 वर्ष रा. डोरनाळी, कालींदाबाई बालाजी वडजे वय वर्षे 23 रा. तांदळी, सुनिता चंद्रकांत शिंदे वय 45 वर्ष रा. डोरनाळी, सुरेखा राजाराम शिंदे वय 40 वर्षे रा. डोरनाळी, सुवर्ण फुला मनोहर शिंदे वय 32 वर्षे रा. डोरनाळी, जनाबाई नागोराव जाधव वय 55 वर्षे रा. वडगाव, लक्ष्मीबाई मिलिंद जाधव वय 45 वर्ष रा. वडगाव, शिवनंदा ज्ञानेश्वर देवकते वय 30 वर्षे रा. डोरनाळी या आठ महिला गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बाराहाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ 108 व 102 या रुग्णवाहिकेतून मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. श्यामसुंदर बळीराम बिरादार वय 33 वर्षे रा. वडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.न. 350/ 2021 कलम 274, 304, (अ) , 337, 338 भा.द. वि. सहकलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाण्याचे एपीआय कमलाकर गड्डीमे साहेब हे करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment