• Home
  • उमरी तालुक्यातील गोदावरी पात्रातील रेतीच्या चार वाहनावर कार्यवाही अवैध रेती प्रकरणी चार लाख 50 हजार रुपयांचा दंड.

उमरी तालुक्यातील गोदावरी पात्रातील रेतीच्या चार वाहनावर कार्यवाही अवैध रेती प्रकरणी चार लाख 50 हजार रुपयांचा दंड.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201225-WA0057.jpg

उमरी तालुक्यातील गोदावरी पात्रातील रेतीच्या चार वाहनावर कार्यवाही अवैध रेती प्रकरणी चार लाख 50 हजार रुपयांचा दंड.
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
उमरी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील चोरट्या मार्गाने अवैधरित्या रेती उपसा वाहतूक होत आहे . प्राप्त तक्रारीनंतर स्थानिक महसूल प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नसल्याने शेवटी उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई करण्यात आली असून धर्माबाद विभागाचे अतिरिक्त पदभार असलेले भोकर येथील उपविभागीय अधिकारी डॉ. राजेंद्र खंडाळे यांनी त्यांच्या आदेशानुसार उमरी महसूलचे तलाठ्यांनी धडक कार्यवाही करून तीन हायवा टिपर व एक टिप्पर जप्त केली. यातील एक टिप्पर मालकांनी एक लाख 50 हजार रुपयांचा दंड भरून टिप्परची सुटका करून घेतली. तर तीन हायवा टिप्पर कार्यवाहीसाठी लावण्यात आले आहेत या टिप्पर मालकास प्रत्येकी तीन लाख पन्नास हजार रुपये दंडाची नोटीस काढण्यात आली आहे. सध्या तालुक्यातील गोदावरी घाटा लगत असलेल्या वाळू साठ्याचा दोघांना वाळू उचलण्याचा परवाना दिला गेला आहे. यातील एकाची मुदत संपलेली आहे तर एका ची मुदत शिल्लक आहे या शिल्लक परवानाधारकांची पावती घेऊन काही वाळूतस्करांनी एकाच पावतीवर अनेक वेळा वाहतूक करीत आहेत या सर्व प्रकारावर येथील महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे म्हणून उपविभागीय अधिकारी धर्माबाद येथील अधिकाऱ्यांना ही कार्यवाही करावी लागली. कार्यवाही करून तीन टिप्पर ताब्यात घेतले असून एक टिप्पर दंड भरून सुटका करून घेतली आहे उर्वरित टिप्पर उमरी तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानात लावण्यात आले आहेत

anews Banner

Leave A Comment