Home नांदेड बरबड्यातील सोयाबीन चोरी प्रकरणातील टोळीस अखेर कूंटूर पोलिसांनी केले जेरबंद

बरबड्यातील सोयाबीन चोरी प्रकरणातील टोळीस अखेर कूंटूर पोलिसांनी केले जेरबंद

101
0

राजेंद्र पाटील राऊत

बरबड्यातील सोयाबीन चोरी प्रकरणातील टोळीस अखेर कूंटूर पोलिसांनी केले जेरबंद

नांदेड, दि.२५ – राजेश एन भांगे

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बाजार समितीत असलेल्या एका गोदामातून एक लाख बेचाळीस हजार आठशे रुपयाचे सोयाबीन चोरल्याची घटना १६ डिसेंबर रोजी घडली होती.याप्रकरणी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु कुंटूर पोलिसांनी अतिशय बारीक लक्ष ठेऊन या चोरांना पकडण्यात यश मिळवलं आहे.

मौजे बरबडा येथील खाजगी गोडाऊन मधून 40 क्विंटल सोयाबीन चोरी प्रकरणी दिनांक 16/12/2020 रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यात अज्ञात आरोपी असल्यामुळे सपोनि करीम पठाण यांच्या मार्गदर्शनानुसार बीट जमादार नागोराव पोले,पोलीस नाईक भार्गव सुवर्णकार,पोलीस नाईक विजय आवुलवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित व्यक्तींच्या हालचालीवर रात्रंदिवस विशेष लक्ष ठेवून व त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या सर्वांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. यात प्रथमेश प्रभाकर पंपटवार (वय 19 वर्ष ),
पवन प्रभाकर माचनवाड( वय 19 वर्षे),ओम माधव कुराडे ( वय 24 वर्ष), तिरुपती किशन ऊलगुलवाड (वय 22 वर्षे) सर्व राहणार बरबडा तर संभाजी बालाजीराव कवळे (वय 22 वर्षे) राहणार ईळेगाव ता. उमरी यांचा समावेश आहे.तसेच सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले दोन चार चाकी वाहन देखील कुंटूर पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे.
या पाचही आरोपीस प्रथम वर्ग नायगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पो.उपनिरिक्षक जांभुळकर साहेब करत आहेत.

Previous articleउमरी तालुक्यातील गोदावरी पात्रातील रेतीच्या चार वाहनावर कार्यवाही अवैध रेती प्रकरणी चार लाख 50 हजार रुपयांचा दंड.
Next articleसुपरस्टार रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल   
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here