• Home
  • कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201225-WA0045.jpg

कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश. जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन इटणकर
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी. (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल दिनांक 24 दिसंबर 2020 कर्नाटक राज्यातील 5762 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यांच्या सीमावर्ती भागाच्या पाच किलोमीटर अंतरावरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील हाणेगाव मानूर बिजलवाडी व मुखेड तालुक्यातील हळणी या गावातील दारू दुकाने दिनांक 25 डिसेंबर 2020 ते 27 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी आज रोजी दिले आहेत अशी माहिती नांदेड जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

anews Banner

Leave A Comment