• Home
  • गोजेगाव शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त ..

गोजेगाव शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त ..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201225-WA0039.jpg

गोजेगाव शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त ..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुक्रमाबाद – काल दिनांक 24 डिसेंबर रोजी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार गोजेगाव बँकेच्या शाखेत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.ज्या शेतकर्‍यांनी कधीच कुठल्याच बँकेचे पिक कर्ज घेतले नाही असे नवीन सातबारा कोरा असणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी बँकेकडे अर्ज सादर केले होते. कुठल्या ही बँकेचे कर्जदार नसलेल्या शेतकऱ्यां ना देखील कर्ज मिळत नाही.शासनाने वारंवार सांगून देखील शेतकऱ्यांना अर्ज करून सुद्धा शेतकरी कर्जापासून वंचित आहेत हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल. अशी प्रतिक्रिया गोजेगाव शाखेतील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली.तीन ते चार महिने लोटले सुद्धा एसबीआय शाखा गोजेगाव यांनी अद्यापही शेतकर्‍यांना नवीन पीक कर्ज वाटप केलेले नसून शेतकरी मात्र बँकेच्या दारात हेलपाटे मारून बेजार झाले आहेत. शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळेल या आशेने मात्र तीन ते चार महिने लोटले तरी बँकने अजूनही पीक कर्ज दिले नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पूर्ण संपला असून रब्बी हंगाम पण संपत आला आहे अद्यापही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही शेतकरी वारंवार बँकेचे खेटे मारत असून मुजोर कर्मचारी व फिल्ड ऑफिसर पुढील खरीप हंगामात तुम्हाला पिक कर्ज मिळेल अशी उत्तरे देत आहेत अशी वेळ गरीब शेतकऱ्यावर प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

anews Banner

Leave A Comment