Home नाशिक रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220626-WA0000.jpg

रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका                नाशिक,(दिलीप चव्हाण ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मातृसेवा फाउंडेशन, ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल.
‘एक रोपटं लावा’ त्या रोपट्यासोबत सेल्फी फोटो काढून खालील नंबरवर व्हाट्सऍप करा
7499868046
ही स्पर्धा निशुल्क, सर्वांसाठी खुली असून याचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
1) झाड देशी असावे.
2) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा (धरावा)
3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी असावा
4) सेल्फी सोबत आपली माहिती पाठवावी : आपले संपूर्ण नाव, वय, पत्ता, मोबा नंबर, व्हाट्स ऍप नंबर, कोणते झाड लावले त्याचे नाव, आणि त्या वृक्षाबद्दल खालील माहिती लिहून पाठवायची आहे. अधिक माहितीसाठी https://shikshakdhyey.com या संकेतस्थळाला भेट द्या.
5) निवडक स्पर्धकांना शिक्षक ध्येयचा प्रिंट दिवाळी अंक कुरिअरने पाठविण्यात येईल.
6) उत्कृष्ट आणि ओरिजिनल सेल्फी पाठविणाऱ्या स्पर्धकांचा फोटो शिक्षक ध्येय मध्ये प्रसिध्द करण्यात येईल.
8) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं, कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येय चे प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.
9) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.
11) या स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. ही स्पर्धा नि:शुल्क असून सर्वांसाठी खुली आहे.
12) अंतिम निकाल, विजेत्यांची नावे सोमवार 8 ऑगस्टच्या शिक्षक ध्येय अंकात प्रसिद्ध होईल.
13) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.
सेल्फी पाठविण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आहे.
या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत प्रत्येकाने – शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी – सहभाग नोंदवावा असे आवाहन मातृसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका संध्या सावंत आणि शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार, कार्यकारी संपादक प्रभाकर कोळसे, वर्धा
मुख्य सहायक संपादक:
रमेश खरबस, अकोले (अहमदनगर), आणि संपादकीय मंडळ यांनी केले आहे.

Previous articleआमदार संजूभाऊ गायकवाड पक्का शिवसैनिक!
Next articleराज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात प्रा. हेमंत चोपडे परिसंवादक     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here