• Home
  • मा .जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशांचे पालन करत देगलूर येथे संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद..

मा .जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशांचे पालन करत देगलूर येथे संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद..

मा .जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशांचे पालन करत देगलूर येथे संचारबंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर शहरात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेड जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशावरून दिनांक 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन पाळण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. कोरोना covid-19 चा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत असल्यामुळे करण्यात आलेल्या दहा दिवसाच्या संचार बंदीस उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून पहावयास मिळत आहे. देगलूर शहरातील मुख्य बाजारपेठ , मदनुर नाका, नवीन बस स्थानक व इतर भागात रस्त्यावर शूकशुकाट पाहावयास मिळाला.जनतेकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शहर प्रशासन व तालुका प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

anews Banner

Leave A Comment