Home नाशिक जनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

जनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

181

आशाताई बच्छाव

IMG_20231201_191515.jpg

 

जनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

नाशिक, दिलीप चव्हाण ब्युरो चीफ :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २८/११/२०२३ रोजी क्रांतीसुर्य ज्योतिबा महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन इ. ८ वी क च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. समुद्धी बोडके हिने केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे ह्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कु. आदित्य करचे व आदिती खरात यांनी महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व त्यांचे शिक्षणाविषयीचे धोरण कसे होते ह्याची विद्यार्थ्यांना विस्तृत माहिती दिली. यानंतर कु. प्रसाद भालेकर ह्याने महात्मा फुले यांच्या वरील स्वरचित काव्य “ स्त्री शिक्षणाची सावली ” हे सादर केले . व हर्षिता गायकवाड हिचे उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. एस.डी. शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका के.एस. आगळे , वाघ मॅडम उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना गोवर्धने मॅडम ह्यांचे मार्गदर्शन लाभले

Previous articleगोंडउमरी येथे वंचित बहुजन महिला आघाडीची सभा
Next articleमहापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती. -मुंबई ५ डिसेंबरला पासून विशेष रेल्वे अमरावतीहुन मुंबईला सुटणार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.