Home अमरावती महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती. -मुंबई ५ डिसेंबरला पासून विशेष रेल्वे अमरावतीहुन मुंबईला सुटणार.

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती. -मुंबई ५ डिसेंबरला पासून विशेष रेल्वे अमरावतीहुन मुंबईला सुटणार.

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20231202_051650.jpg

महापरिनिर्वाण दिनासाठी अमरावती. -मुंबई ५ डिसेंबरला पासून विशेष रेल्वे अमरावतीहुन मुंबईला सुटणार.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती विभागीयसंपादक
अमरावती.
प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने अमरावती ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी ५ डिसेंबर२०२३ रोजी अमरावती रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे रवाना होईल, तर ७ डिसेंबर२०२३ रोजी मुंबई येथून अमरावती परत येणार आहे . अमरावती-मुंबई अनारक्षित विशेष गाडी क्रमांक ०१२२१८ ही ५ डिसेंबर रोजी अमरावती येथून ५ वाजून ४५ मिनिटांनी रवाना होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२१७ ही गाडी ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२ वाजून ४० मिनिटांनी वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला बडनेरा, अकोला ,शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या रेल्वे स्थानकावर थांबे देण्यात आले आहे. एकूण या गाडीला १४ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहे. या विशेष गाडीने प्रवास सुखकर व्हावा आणि प्रवास दरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी प्रवाशांनी वैद्य तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आव्हान भुसावळ रेल्वे जलसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.

Previous articleजनता विद्यालयात महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
Next articleॲडव्हान्स न दिल्यामुळे सुवर्णकराचा खून बांधकाम मिस्त्री ने केला भूत व खून प्रकरणाचा ३६एलसीबीने लावला छडा. आरोपी कडून ७ लाख३७ हजाराचे सोने जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here