कोव्हिड लसिकरण केंद्रांचे जि.प.सदस्या सौ.अश्विनीताई पा.गोजेगावकर यांच्या हस्ते उदघाटन..
▶️नागरिकांच्या मागणीला यश
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षता घेता नागरिकांच्या सोयी साठी मुक्रमाबाद येथील नागरी दवाखाना येथे मंगळवार दि. २३ मार्च रोजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई पाटील गोजेगावकर यांच्या हस्ते कोविड – १९ च्या लसीकरणाची सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान मुक्रमाबाद परिसरातील नागरिकांनी येथे लसीकरण सुरू करण्याची मागणी केली होती या मागणीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दखल घेऊन लसीकरण सुरू करण्यास तालुका आरोग्य विभागला कळविले आहे.
राज्यभरात कोरोना संसर्ग महामारीने पुन्हा थैमान घातला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी न घाबरत नियमांचे पालन करत याचा सामना करावा दरम्यान मुखेड तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय मुखेड, बाह्राळी, सावरगाव, राजुरा, चांडोळा, सावरमाळ, मुक्रमाबाद सह सात ठिकाणी लसीकरण सुरू आहेत. दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ची
कोविशिल्ड ही वैक्सीन आरोग्यदायक असून या लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत त्यामुळे परिसरातील नागरिकांनी वय ४५ ते ५९ या वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अश्विनीताई पाटील गोजेगावकर, सरपंच अंजिता बोधने, उपसरपंच सदाशिव बोयवार, बालाजी बोधने, बाळाजी पसरगे, अनुसया बोयवार, तमप्पा गंदिगुडे, दिलीप पंदिलवार, गौस खा पठाण, किशन अमदापुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. जगदीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अभिषेक नाईक, आरोग्य सहायक गंगाशेट्टी किरसंब्रे, औषध निर्माता बी. ए. वानोळे, शरणप्पा बोधने, आरोग्य सेविका सुनंदा दामेकर, छाया सुरवंशी आरोग्य सेवक ए एस बादाडे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
मुक्रमाबाद येथे गेल्या पाच वर्षापूर्वी मंजूरी मिळालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत अद्ययावत आहे.पण राजकीय पुढाऱ्यांनी श्रेय लाठण्यासाठीच इमारतीचे उद्धघाटन होवु दिले नसल्याचे चर्चा होत असुन शासनाने लाखो रुपये खर्च करुन बांधण्यात आलेली सुसज्ज इमारत उद्धघाटनाअभावी धुळ खात पडली असुन प्रशासन व आरोग्य विभागाने याची नोंद घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.
