• Home
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन

चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन

 

हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरातील नगरपालिकेच्या भारतीय कर्मचारी महासंघ मुंबई चतुर्थ श्रेणी संघटनेच्या वतीने आज दि.२८/१२/२० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत थाळीनाद आंदोलन केले , या आंदोलनात २१/१०/२०२० रोजी सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी यांनी सफाई कामगार यांचे बरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात यावा असे सुचवले असताना सुध्दा, गेली अडीच महिने कोणतीही मिटींग, व चर्चा कार्यालयीन अधिक्षक मारुती कदम,यांनी न घेता उलट मागासवर्गीय दलीत कर्मचारी वर्गाला जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल ते पाहीले.
याचा परीणाम दिपावलीच्या सानुग्रह अनुदान वाटपावेळी वडगांव शहराने अनुभवाला आहे. आणि म्हणुन विभाग प्रमुख सुप्रिया गोडेकर आणि कार्यालयीन अधीक्षक मारूती कदम यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. याच बरोबर सेवा ज्येष्ठता यादीनुसार प्रताप सावंत यांना मुकादम म्हणुन नियुक्ती आणि अन्य अस्थापनातील सफाई कामगार यांना त्यांच्या मुळ कामावर नियुक्ती करण्यात यावी अन्यथा ४ जानेवारी २०२१ बोंब मारो आंदोलन्याचाइशारा दिला आहे.
तरीही प्रशासनाने दखल न घेतल्यास २५ जानेवारी २०२१ पासुन बेमुदत आमरण उपोषण करणार असलेचे चतुर्थ कर्मचारी संघटना पदाधिकारी
अध्यक्ष महेश जाधव , उपाध्यक्ष अमित कांबळे , सचिव सुरेंद्र पवार , खजिनदार पांडुरंग मुंदाळे , सहसचिव गजानन धनवडे , संघटक सचिव सुधाकर पिसे , इत्यादी मान्यवर उपस्थित होते ,वरील आंदोलनास मुळनिवासी भारतीय संघ , वंचित आघाडी , वडगांव शहर भाजपा , व सिद्धांर्थ नगरमधिल सामाजिक कार्यकर्ते यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
सदरच्या आंदोलन स्थळी सकाळी ११ते ५ पर्यंत यावेळेत पालिका प्रशासनाने आंदोलकांची दखल सुद्धा घेतली नसल्याचे समजते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment