• Home
  • बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची व नागरिकांची तहसील कार्यालयासमोर दिसतो गर्दीचा महापूर…

बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची व नागरिकांची तहसील कार्यालयासमोर दिसतो गर्दीचा महापूर…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201228-WA0106.jpg

बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची व नागरिकांची तहसील कार्यालयासमोर दिसतो गर्दीचा महापूर…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बिलोली – दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवार व नागरिकांची गर्दी बिलोली तहसील कार्यालयात दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी 64 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी बिलोली तहसील कार्यालयात तोबा गर्दी दिसून आली. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची दिनांक 23 डिसेंबर पासून सुरुवात झाली असून त्यातच तीन दिवस सलग सुट्या आल्यामुळे आज रोजी गर्दीचा महापूर दिसून येत असून बिलोली तालुक्यातील एकूण 73 ग्रामपंचायतींपैकी 64 ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया दिनांक 23 डिसेंबर 2020 पासून सुरू झाली असून अर्ज ऑनलाइन करून बिलोली तहसील कार्यालयात नामनिर्देशन स्वीकारण्यात 21 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे तहसील कार्यालय परिसरात सकाळी 11 वाजेपासून गर्दीचा महापूर दिसून येत आहे.

anews Banner

Leave A Comment