• Home
  • मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201228-WA0062.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे बाराहाळी येथे कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन…

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
बाराहाळी – राज्यात कोरोना (covid19) या महामारी चा संकटामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये ही बाब लक्षात घेता बाराहाळी येथील विद्या विकास महाविद्यालय परिवाराच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कै. भाऊसाहेब देशपांडे यांच्या तिसऱ्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी मौजे बाराहाळी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्षा श्रीमती विजयाताई देशपांडे यांच्या हस्ते होणार असून नवतरुणांना रक्तदान संदर्भात संकोच असलेले या विषयावर डॉ. दिलीप पुंडे हे मार्गदर्शन करणार असून दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत विद्या विकास महाविद्यालय बाराहाळी येथे जास्तीत जास्त रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन विद्याविकास महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment