Home उतर महाराष्ट्र नवापाडा आरोग्य केंद्राचा हलगर्जी पणा कायम गरोदर मातांना नेणारी जीवनवाहिनीत जागा नसतांनाही...

नवापाडा आरोग्य केंद्राचा हलगर्जी पणा कायम गरोदर मातांना नेणारी जीवनवाहिनीत जागा नसतांनाही वाहुन नेतांना उतरवले बाकी मातांना ग्रामस्थांची नाराजी..

118

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0023.jpg

नवापाडा आरोग्य केंद्राचा हलगर्जी पणा कायम गरोदर मातांना नेणारी जीवनवाहिनीत जागा नसतांनाही वाहुन नेतांना उतरवले बाकी मातांना ग्रामस्थांची नाराजी..

वासखेडी/धुळे दिपक जाधव प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क -येथील नवापाडा आरोग्य केंद्र हे आदीवासी माळमाथा परीसरातील मुख्य वैद्यकिय प्राथमिक आरोग्य केंद्र होय,याच केंद्राची सुसज्ज अशी वास्तु रचना असुन यात अधिकारी फक्त हवा खातांना दिसतात याच केंद्राचा हलगर्जी पणामुळे गरोदर मातांना होताय यातना पण कोणीही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही ?,यासाठी कोण जबाबदार व्यक्ति आहे असा प्रश्न थेट जनतेतुन होतोय ,ज्या आरोग्य जीवनवाहिनीला आपण अम्बुलन्स म्हणतो त्या जीवनवाहीनीत ज्या गरोदर २४ मातांना कोंबुन नेण्याचा प्रकार जेंव्हा आज रोजी वासखेडी येथील उपकेंद्रा समोर ग्रामस्थ यांच्या नजरेत आला, तेंव्हा होणारी वाहतुक ही गरोदर मातांना वेदनादायक असल्याचे समोर येताच तरीही चालक आवाजावी करतो,तर याचा अर्थ काय समजावा,कारण कोणत्याही वैद्यकीयदृष्ट्या वैदयकीय अधिकारी यांचा हलगर्जीपणा म्हणावा की नावापुढचा अधिकारी ,या गरोदर मातांच्या वेदना का समजत नाही यांना असा प्रश्न जनतेतुन होतांना दिसतो,या वासखेडी उपकेंद्रात डोमकाणी,चिपलीपाडा, वर्सुस,जामकी आदी गावांचा समावेश असुन यातील मातृत्व वंदना या वैद्यकिय चाचणी तसेच लसीकरण कार्यक्रमासाठी ,चिपलीपाडा ०१ वर्सुस ०२,डोमकाणी ०५,वासखेडी येथुन १६असे,एकुण२४ गरोदर मातांना नेण्यासाठी आलेली जीवनवाहीनीचा हा प्रकार असुन त्या वाहीनीची वाहतुक क्षमता अंदाजीत १०/१२ लोकांची असावी ,परंतु यात चक्क २४माता आणि ०४आशा सेविका भरतांना दिसुन आले ,तिथे कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार दिपक जाधव व ग्रामस्थ यांनी वाहकास विचारले असता तरीही तो वाहक जुमानत नव्हता मग याच्या मागे कोणाचे साटेलोटे असावे,असा प्रश्न गावातील सामान्य नागरीकांनी अपस्थित केला, मग काही गरोदर मातांना उतरविण्यात आले,जर यांच्या या हलगर्जी पणामुळे गरोदर मातांना होणाऱ्या यातनेस जबाबदार कोण? अशा बेजबाबदार वैद्यकिय अधिकाऱ्याची कार्यवाही व्हावी,या मागणीवर देखील रोष व्यक्त करतांना नागरीक दिसुन आले,जर गरोदर मातांना अशी नाकर्तेपणाची वागणुक दिली जाते,तर बाकी या आरोग्य केंद्रात उरले तरी काय मग?जर तर बाकी वैद्यकिय योजना या पडद्याआड असेच म्हणावे लागेल, संबधितांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी देखील नागरीकांकडुन होत आहे,

Previous articleपरभणी पोलिस दलाकडून नागरिकांना जाहीर आवाहन
Next articleपालम तालुक्यातील 14 गावांचा संपर्क तुटला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.