Home परभणी परभणी पोलिस दलाकडून नागरिकांना जाहीर आवाहन

परभणी पोलिस दलाकडून नागरिकांना जाहीर आवाहन

118

आशाताई बच्छाव

IMG-20220709-WA0036.jpg

परभणी पोलिस दलाकडून नागरिकांना जाहीर आवाहन

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ(युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)
मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात, मराठवाड्यात व महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. त्यामूळे बऱ्याच ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे परभणी पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे. पुलावरून पाणी जात असल्यास पुल ओलांडू नये.तसेच परभणी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु असल्याने कच्चे व तात्पूरते पूल बनविण्यात आलेले आहेत. या पुलांवरून पाणी जात असल्यास पुलावरून जाऊ नये. पूर पाहण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी पुलावर अथवा नदी काठी जाऊ नये. ज्या भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे किंवा होण्याची शक्यता आहे, अशा भागातील नागरिकांनी सुरक्षीत ठिकाणी जावे अथवा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे.
अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. विद्युत खांबांपासून सावध राहावे. तसेच तुटलेल्या विजेच्या तारेपासून सावध राहावे. जीर्ण किंवा मोडकळीस आलेल्या घरात थांबू नये. पुरपरिस्थितीत धोक्याचा इशारा झाल्यास घरात न थांबता सुरक्षीत ठिकाणी जावे. पुरपरिस्थितीच्या वेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरु नये. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस मदतीची आवश्यकता असल्यास 112 या टोल फ्रि क्रमांकावर कॉल करावा.