Home Breaking News मंत्री रामदास आठवले यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट केली कविता 

मंत्री रामदास आठवले यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट केली कविता 

98
0

 

शिवसेनेच्या नेत्यांना आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे, एकनाथ खडसे आणि खासदार संजय राउत यांच्या पत्नीला ईडीने पाठविलेल्या नोटीसीमुळे राज्यातील राजकारण तापलेले आहे. तर दुसरीकडे आपल्या कवितेमुळे भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट कविता केली आहे.
रामदार आठवले हे शिर्डी दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलत असताना आठवले यांना तुम्हाला ईडीची नोटीस आली का? असा सवाल विचारला असता आठवलेंनी एक भन्नाट कविता सादर केली.
“माझ्याकडे कधी ईडी येणार नाही.
जरी ईडीची नोटीस मला आली तर मी ‘गो करोना गो’ म्हणून तिला मागे पाठवले.
तसा माझा आणि ईडीचा काही संबंध नाही. मुळात ”
मी पित नाही बिडी,”
” मग माझ्या मागे का लागेल ईडी” ?
असे आठवले यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
दरम्यान, मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भाजपासोबत यावे , स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपसोबत येण्याची गरज असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने जाणे योग्य नाही. तुम्हाला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेईन, असे म्हणत आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा ऑफर दिली आहे.

युवा मराठा नूयूज नेटवर्क.

Previous articleचतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन
Next articleनिवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here