Home गडचिरोली आवळगांव व हळदा परिसरातील धुमाकुळ घातलेल्या त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा

आवळगांव व हळदा परिसरातील धुमाकुळ घातलेल्या त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0019.jpg

आवळगांव व हळदा परिसरातील धुमाकुळ घातलेल्या त्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा

   गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव व हळदा परिसरात
गेल्या दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात हळदा येथील दोन शेतकऱ्यांचा बळी गेला तर एक शेतकरी कसाबसा बचावला त्यामुळे हळदा- आवळगाव परिसरातील जनतेमध्ये वन विभागा प्रति तीव्र असंतोष निर्माण झाला असून येत्या 5 दिवसात त्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा.
तालुक्यातील हळदा, बोडधा, कुडेसावली,मुडझा, बलारपुर,आवळगाव, वांद्रा, चीचगाव सह अनेक गावे मोठया जंगला लगत वसलेले आहेत,तसेंच लागूनच शेजारी वैनगंगा नदी आहे.या गावच्या जंगलात वाघ व बिबट या हिंस्त्र प्राण्यांचा वावर मोठया प्रमाणात आहे. हे सर्व गावे कृषी प्रधान असून संपूर्ण शेती ही जंगल परिसरात व वैनगंगा नदीचे शेजारी आहे ,शेतकर्यांना शेतीचे कामे करण्या करता जावेच लागते.त्या वेळात जंगलात व नदीचे परिसरात दबा धरून बसलेले वाघ शेतीचे कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांवर हल्ला चढवून त्यांना जिवंत मारतात .तसेच रात्रीच्या वेळात गावात प्रवेश करून जनावरे,शेळया इत्यादींना फस्त करण्याचे काम दाररोज सुरु आहे, त्यामुळे गावातील जनता भयभीत झालेली असून वाघापासून संरक्षण मिळणे करिता वारंवार वनविभाग यांच्याकडे पत्र व्यवहार सुरू आहे परंतु या सर्वं गावांना वाघा पासून संरक्षण मिळणे फारच कठीण झाले असून वारंवार येथील जनता वाघाचा बळी ठरत आहेत .त्यातच १६ एप्रिल २०२२ रोजी आवळगाव येथील तुळशिराम कामडी , 28 मार्च 2022 रोजी बोडधा येथील कवडू मेश्राम यांचा बळी गेला .त्या नंतर 11 जून रोजी आवळगाव येथील क्षेत्रासहाय्यक करंडे यांच्या वर हल्ला झाला ते थोडक्यात बचावले,आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 जून रोजी हळदा येथील राजेंद्र अर्जुन कामडी व 14 जून 2022 रोजी त्याचं गावातील देविदास परशराम कामडी यांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला तर त्यांचा सोबतचा शेतकरी थोडक्यात बचावला आणि यापूर्वी सुद्धा हळदा गावातील नानु राऊत गंभीर जखमी झाला होता.
तालुक्यातील जंगलव्याप्त अनेक गावांमध्ये मागील एक वर्षा पासून आता पर्यंत वाघांच्या हल्ल्यामुळे 18 ते 20 लोकांचा बळी गेला आहे.आणि सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू झाल्याने लोकांना आपल्या शेतीच्या हंगामाची कामे पार पाडावी लागत आहेत.आणि अश्या परिस्थितीत त्यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे, तसेच वाघांची दहशत आता जंगल सोडून गावा शेजारी दिसून येत आहे.या सर्व बाबींचा वनविभाग प्रशासनाने गांभीर्याने विचार करून सातत्याने हल्ले करणाऱ्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री.खेमराजजी तिडके
ब्रह्मपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य मा.श्री.थानेश्वर पाटील कायरकर
चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस मा.रुपेश बानबले
ब्रह्मपुरी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. सोनू भाऊ नाकतोडे
आवळगांव ग्रामपंचायतीचे सदस्य मा.श्री.प्रितमजी बाबनवाडे
आवळगांव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.श्री.अनिलजी कांबडी
ब्रह्मपुरी येथील युवा कार्यकर्ते सुरज भाऊ मेश्राम कोसंबी येथील ग्रामपंचायत सदस्य छत्रपती भाऊ सुरपाम तसेच बहुसंख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते

Previous articleवाघाने घेतला इंजेवारी येथील इसमाचा बळी।
Next articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गडचिरोली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो पुरुष व महिलांचा पक्ष प्रवेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here