Home नांदेड देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध     

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध     

155
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध      देगलूर,( संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                          देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक ही सुज्ञ ग्रामस्थांच्या मध्यस्थीतून बिनविरोध पार पडली आहे. दहा वर्षापूर्वी अनुसूचित जातीतील सुधांशू कांबळे यांना खुल्या प्रवर्गातून बिनविरोध सरपंच करण्याचा विक्रम याच गावाने केला होता. दीड हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात 2020 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन गट तयार होऊन निवडणूक होण्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक जाणकार राजकीय पुढाऱ्यांना येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विनाकारण वाद होऊन गावात दुफळी निर्माण होण्याची शंका वाटत असल्याने माजी सरपंच नरसिंग पा.कदम, तुकाराम पा. कदम, सुधांशू कांबळे, गिरीश देशमुख, व्यंकट पाटील जाधव, शामराव माने, सर्जेराव पा. कदम, दिगंबर पा. कदम, विजय पा., भरत पा.कदम, हनुमंत जाधव, निवृत्ती बजिरे, नागोराव वाघमारे, सोपान चंद्रकांत वाघमारे, शेषराव चव्हाण, नागेश कदम, माजी उपसरपंच बाजीराव कदम आदींनी सामंजस्याची भूमिका घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी समोर आलेल्या गटांने संमती दिली. याचेच फलित लिंगन केरुर ग्रामपंचायत आज मितीस बिनविरोध निघाली आहे. सदर ग्रामपंचायत दिड हजार लोकसंख्येची असून ग्रामपंचायतीवर सात सदस्य निवडून येतात सन 2020 च्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी दोन, ओबीसीसाठी दोन जागा, खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत तर पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते महादेव सुधाकर जाधव व बालाजी वामनराव कदम यांनी सरपंच पदासाठी आपापले गट तयार करून फिल्डिंग लावली होती. दरम्यान येथील ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होणार असे चित्र दिसत असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या महादेव जाधव व बालाजी कदम या दोघांनी फिफ्टी-फिफ्टी सरपंचपद वाटून देण्याची ऑफर देऊन ग्रामस्थांनी होणाऱ्या निवडणूक नाट्यावर शिताफीने पडदा टाकला. या निवडीसाठी देगलूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here