Home नांदेड देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध           ...

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध                                                                        युवा मराठा न्युजकडून अभिनंदन …!

99
0

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध                                                                        युवा मराठा न्युजकडून अभिनंदन …!

माधव जाधव व बालाजी कदम यांची सरपंच पदासाठी फिफ्टी-फिफ्टी चा फार्मूला वापरून सहमती…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्‍यातील लींगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक ही सुज्ञ ग्रामस्थांच्या मध्यस्थीतून बिनविरोध पार पडली आहे. दहा वर्षापूर्वी अनुसूचित जातीतील सुधांशू कांबळे यांना खुल्या प्रवर्गातून बिनविरोध सरपंच करण्याचा विक्रम याच गावाने केला होता.
दीड हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन गट तयार होऊन निवडणूक होण्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक जाणकार राजकिय पुढाऱ्यांना येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विनाकारण वाद होऊन गावात दुफळी निर्माण होण्याची शंका वाटत असल्याने माजी सरपंच नरसिंग पा. कदम, तुकाराम पा.कदम, सुधांशू कांबळे, गिरीश देशमुख व्यंकट पा. जाधव,शामराव माने, सर्जेराव पा कदम, दिगंबर पा. कदम,विजय पा . भरत पा बोंडगे,हनुमंतराव जाधव, निवृत्ती बजिरे, नागोराव वाघमारे, सोपान पांडवे, चंद्रकांत वाघमारे ,शेषराव चव्हाण, नागेश कदम, माजी उपसरपंच बाजीराव कदम,आनंद पा. कदम, भुजंग जोंधळे, देवराव ठावरे, मारुती कांबळे, दाऊ कांबळे सुभाष कदम आदींनी सामंजस्याची भूमिका घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा घडवून आणली. यास ग्रामस्थ व निवडणुकीसाठी समोर आलेल्या गटाने संमती दिली. याचेच फलित लिंगन केरुर ग्रामपंचायत आज मितीस बिनविरोध निघाली आहे .
सदर ग्रामपंचायत दीड हजार लोकसंख्येची असून ग्रामपंचायतीवर सात सदस्य निवडून येतात. या सन २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन अनुसूचित जातीसाठी दोन ओबीसीसाठी तर दोन जागा या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत . सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते माधव सुधाकर जाधव व बालाजी वामनराव कदम यांनी सरपंच पदासाठी आपापले गट तयार करून फिल्डिंग लावली होती. दरम्यान येथील ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होणार असे चित्र दिसत दिसत असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या माधव जाधव व बालाजी कदम या दोघांना फिफ्टी-फिफ्टी सरपंच पद वाटून देण्याची ऑफर देऊन ग्रामस्थांनी होणाऱ्या निवडणुक नाट्यावर शिताफीने पडदा टाकला. सोबतच वार्ड क्रमांक एक मध्ये संजय माने,मारुती कांबळे ,वार्ड क्रमांक तीन मध्ये सिताराम चव्हाण या सदस्यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली .
दरम्यान वार्ड क्रमांक दोन मध्ये मारुती पांडवे यांना बिनविरोध निवडण्यात आले असून एका जागे साठी बिनविरोध होण्यास अडचण येत असली तरीही त्यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत ०५ सदस्यासह सरपंच पदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. मागील दहा वर्षांपूर्वी सन २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्रित बसून अनुसूचित जातीतील उमदे नेतृत्व तथा बेधडक पत्रकार म्हणून ओळख असलेले सुधांशू कांबळे यांना बिनविरोध सरपंच करण्याचा मोठा विक्रम येथील ग्रामस्थांनी केला होता . पुन्हा दुसऱ्यांदा खुल्या प्रवर्गासाठी ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सरपंच म्हणून गावकऱ्यांनी आमच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना निर्वाचित बिनविरोध सरपंच पदाचे दावेदार बालाजी कदम व माधव जाधव यांनी व्यक्त केली आहे. नवनिर्वाचित बिनविरोध सरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांनी पुष्पहार व गुलालाची उधळण करून सत्कार केला तसेच आनंदोत्सव साजरा केला. युवा मराठा न्यूज चॅनल च्या वतीने सुद्धा त्यांचे अभिनंदन करण्यात आले .या बिनविरोध निवडीसाठी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleदेगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध     
Next articleऔद्योगिक कामगारांना “अपघाती विमा योजना” लागू करावी,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here