Home कोल्हापूर औद्योगिक कामगारांना “अपघाती विमा योजना” लागू करावी,

औद्योगिक कामगारांना “अपघाती विमा योजना” लागू करावी,

95
0

राजेंद्र पाटील राऊत

औद्योगिक कामगारांना “अपघाती विमा योजना” लागू करावी,

औद्योगिक कामगार, कर्मचारी व अधिकारी यांना, शासकीय धोरणाप्रमाणे, “अपघाती विमा योजना” लागू करावी, यासाठी
राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचेवतीने,
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सतेज डी. पाटील साहेब यांचेकडे, निवेदनाद्वारे मागणी.
वित्त विभाग, महाराष्ट्र शासन – क्र. संकीर्ण २०१९ / प्र. क्र. १४१ / २०१९ / कोषा. प्रशा. ५, दि. ३१ / ८ / २०२० नुसार, – शासकीय / निमशासकीय अधिकारी, कामगार व कर्मचारी यांना, त्यांच्या स्वेच्छेनुसार, कांही राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून, “अपघात विमा योजना”, शासनाच्या अधिकृत पत्राद्वारे सूचित करण्यात आलेली आहे.
याच धर्तीवर औद्योगिक कामगार / कर्मचारी व अधिकारी यांना, सदर योजनेचा लाभ संबंधित राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून मिळणे गरजेचे आहे. कारण सध्या कोरोनामुळे औद्योगिक क्षेत्राची खूप मोठी हानी झालेली आहे. या क्षेत्रातील सर्वांचे अपरिमित नुकसान झालेले आहे, जे कधीही भरून न येणारे आहे. केंद्र सरकारचे बदलते कामगार विषयक धोरण व कामगार कायद्यातील अमुलाग्र बदल यामुळे, औद्योगिक क्षेत्र हवालदिल झालेले आहे. त्याचबरोबर नैराश्येच्या गर्तेत सापडलेले आहे.
महाराष्ट्र शासनाने ज्या प्रकारे सर्व शासकीय घटकांना वरील आदेशास अनुसरुन, सर्वच सचिव महोदयांना आदेश पारित केलेले आहेत. शासनास कोणत्याही स्वरुपाचा आर्थीक बोजा पडणार नसल्यामुळे, वरील प्रमाणे औद्योगिक क्षेत्रासाठी ऐश्चीक स्वरूपात, “अपघात विमा योजना” सुरू करणेबाबत, संबंधित बँकांना योग्य त्या चर्चेद्वारे सूचित करावे व औद्योगिक क्षेत्रातील कामगार व अधिकारी वर्ग यांना दिलासा द्यावा, अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री मा. ना. सतेज पाटील साहेब यांना, राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या वतीने दिले असल्याचे, असोसिएशनचे अध्यक्ष मा. सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी कार्यकारी सदस्य मा. महादेव चक्के, मा. शिवाजी चौगले, मा. ब्रम्हानंद कसबेकर, मा. बाजीराव हेवाळे, मा. जयसींग शिंदे, मा. संजय जगताप, मा.पांडुरंग साळवी, मा. सर्जेराव पाटील, मा.सिकंदर पटेल, मा. विजय जाधव, मा. गणेश पोटफोडे, मा. बबन देवर्डेकर, मा.शिवदत्त यादव, मा. बाळासाहेब कांबळे, मा. ज्ञानदेव शिंदे, मा. संभाजी थोरात, मा. यशवंत पाटील, मा. सर्जेराव पवार, मा. बाळासाहेब चौगले, मा. लक्ष्मण गळवे, अॅड. चिंतामणी कांबळे, मा. सर्जेराव हळदकर, मा. प्रताप घेवडे, मा. भगवान माने, मा. अशोक बोडके, मा. शामराव पोवार, मा. राजेंद्र पवार, मा. शरद देसाई, मा.दिनकर आडसूळ इत्यादी उपस्थित होते.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleदेगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध                                                                        युवा मराठा न्युजकडून अभिनंदन …!
Next articleEWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here