Home कोल्हापूर ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता

ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता

102
0

राजेंद्र पाटील राऊत

ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीची सत्ता

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीमधे कॉंग्रेसचे जास्तीत-जास्त सदस्य विजयी होतील. यामध्ये, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व महाविकास आघाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये आपला करिश्‍मा दाखवतील, अशी आशा गृहराज्यमंत्री आणि कॉंग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.सतेज पाटील यांनी आज व्यक्त केली.
मंत्री सतेज पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रभाव जास्त आहे. गावागावात हा प्रभाव दिसून येणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक गटा-तटाची असते. तरीही, या ठिकाणीही महाविकास आघाडीचे सदस्य आणि सरपंच झालेली दिसतील. गाव पातळीवरील तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नेते याच प्रकारचा अजेंडा घेवून काम करताना दिसत आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचा एकूणच सर्व कारभार पाहिला तर, लोक आता महाविकास आघाडीलाच पंसती देत आहेत.
जिल्ह्यातील ४३३ पैकी जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीच सत्तेवर असेल यात शंकाच नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे प्राबल्य असेल यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानूसार गावागावातील कार्यकर्ते ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीचीच सत्ता येईल यासाठी प्रयत्नशील आहेत. तसे नियोजनही केले जात असल्याचेही मंत्री श्री.सतेज पाटील यांनी सांगितले.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here