• Home
  • 🛑 कचरा समजून फेकले दागिने…! सफाई कर्मचार्‍यांने १८ टन कचऱ्यातून शोधून परत केले 🛑

🛑 कचरा समजून फेकले दागिने…! सफाई कर्मचार्‍यांने १८ टन कचऱ्यातून शोधून परत केले 🛑

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कचरा समजून फेकले दागिने…! सफाई कर्मचार्‍यांने १८ टन कचऱ्यातून शोधून परत केले 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी घंटा गाडीने कचरा गोळा करण्यात आला. तो मोशी येथील कचरा डेपोत खाली करण्यात आला. दरम्यान, एका महिलेने पाच ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने एका पर्ससह कचऱ्यात गेल्याचं सांगितलं.

संबंधित महिलेने दिवाळीनिमित्त घरातील सफाईचे काम सुरू होते. तेव्हा, काही विचार न करता ती पर्स वापरातील नसल्याने तशीच कचऱ्यात टाकून दिली. नंतर हा प्रकार लक्षात आला.

याची माहिती मोशी येथील कचरा डेपोतील सफाई कर्मचारी हेमंत लखन यांना देण्यात आली.

संबंधित महिलेला समक्ष बोलवून १८ टन कचऱ्यातून महिलेची पर्स शोधून त्यातील पाच ग्रॅम सोन्याचे पेंडल आणि चांदीचे जोडवे त्यांना परत केले. यावेळी हेमंत लखन म्हणाले की, “सोने-चांदी किती आहे हे म्हत्वाचे नाही.

त्या महिलेने कष्टाच्या पैशातून त्यांनी ते सोने सुनेसाठी बनवले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचे होते.”…⭕

anews Banner

🛑 मराठा शहाण्णव कुळी प्रतिष्ठानच्या वतीने खेड पोलीस निरीक्षक पत्की मॅडमचा सन्मान 🛑 ✍️खेड ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) रत्नागिरी/खेड:⭕ मराठा 96 कुळीं प्रतिष्ठान अनेक उपक्रम राबवत असते. वृद्धाश्रम मध्ये फळवाटप,बिस्कीट वाटप,अन्नधान्य वाटप करत असते. आदिवासी भागात मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आले होते.कोरोनाच्या महामारी मध्ये वेगवेगळ्या भागात जाऊन अन्नधान्य वाटप आणि अन्नधान्य चे पाकिटे गरजू लोकांना वाटप करण्यात आले. असे विविध उपक्रम मराठा 96 कुळीं प्रतिष्ठान आयोजित करत असते.कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने जगभरात तसेच भारत देशात मार्च पासून तैमान घातले आहे. अश्या परिस्थिती देशाच्या कोपऱ्यात पण कोरोना पोचला आणि स्थानिक यंत्रणावर त्याची जबाबदारी येऊन पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की मॅडम यांनी कोरोना महामारी काळात संपूर्ण खेड तालुक्यात अहोरात्र परिश्रम घेऊन, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्याची दखल घेऊन त्यांचा मराठा शहाण्णव कुळी प्रतिष्ठान ने सन्मान केला. मराठा शहाण्णव कुळी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र जाधव व खजिनदार श्री अरविंद सकपाळ यांच्या हस्ते खेड पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की मॅडम यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.याप्रसंगी संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते…..⭕

By राजेंद्र पाटील राऊत

Leave A Comment