• Home
  • *सटाणा नगरपालिका प्रभाग क्र.2 मध्ये विकासकामांचा शुभारंभ*

*सटाणा नगरपालिका प्रभाग क्र.2 मध्ये विकासकामांचा शुभारंभ*

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201117-WA0001.jpg

*सटाणा नगरपालिका प्रभाग क्र.2 मध्ये विकासकामांचा शुभारंभ*
अजमिर सौंदाणे (जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)–सटाणा शहरातील नगरपालिका प्रभाग 2 मधील श्री कृष्ण नगर येथील सर्व्हे नं.९९ मधील मोकळा भूखंड व सन्मित्र हौसिंग सोसायटी मधील नाना नाणी पार्क चा शुभारंभ नगरध्यक्ष सुनिल मोरे यांच्या हस्ते संपन्न झाला असून या प्रसंगी उपनागरध्यक्ष,गटनेते, सभापती तसेच सर्व नगरसेवक व प्रभागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित असल्याची माहिती भा.ज.प.गटनेते तथा मा.उपनगरध्यक्ष महेश देवरे यांनी दिली असून प्रभागात अजून जवळपास ५ भूखंड विकसित होणार असून प्रभागातील पाणी,रस्ते व आरोग्य याविषयावर उत्तम काम झाल्या मूळे समाधानी असल्याचे महेश देवरे यांनी सांगितले.
प्रभागातील विकासकामासाठी मा.संरक्षणराज्यमंत्री डॉ. सुभाष बाबा भामरे यांनी वेळोवेळी भरीव निधी दिल्यामुळे आज प्रभागाचा चेहर–मोहरा बदलला असून भविष्यात प्रभागातील मूलभूत तसेच भौतिक सुविधा व नाना–नानी पार्क,ग्रीनजीम, ७ लक्ष लिटर क्षमतेचा पाण्याचा जलकुंभ,रस्ते खडीकरण,कॉक्रीटीकरण या कामांचे
भविष्यात टप्पा–टप्पाने लोकांपूर्ण सोहळा परपडणार आहे.ह्या विकासकामामुळे प्रभागातील युवा वर्ग,महिला, रहिवाशी,नागरिक,नगरसेवक महेश देवरे यांच्या कामकाजावर समाधानी असल्याचे दिसते

anews Banner

Leave A Comment