• Home
  • शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

Rajendra patil raut

IMG-20201116-WA0089.jpg

शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून समजले जाणारे कापूस बोंड अळीमुळे कवडीमोल.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
सततच्या पडणारा दुष्काळ आणि यात परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्यातून शेतकरी अध्याप सावरला नाही हाती आलेल्या पिकालाही बाजारपेठेत भाव नाही त्यामुळे अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यावर बोंड आळी चे नवे संकट उभे राहिले आहे कापूस हे नगदी पीक समजले जाते या पिकावर शेतकऱ्यांचे बजेट अवलंबून असते परंतु बोंड आळी मुळे पांढरे सोने मातीमोल होत आहे सध्यास्थिती कापसा वरच्या उत्पादनखर्च निघणे अवघड झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे वास्तविक पाहता अनेक शेतकऱ्यांच्या वार्षिक ताळेबंद हा सोयाबीन व कापसाच्या उत्पादनावर अवलंबून असतो अनेक शेतकरी आपल्या संसाराचा घर गाडा चालवतात परंतु यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने सुरुवात करून देत खरिपातील मूग उडीद सोयाबीन पिके मातीमोल केली आहेत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उरलीसुरली मंदार कापूस पिकावर होती परंतु मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील कापूस पिकावर बोंड आळी आक्रमण केले आहे या अळीचा सर्वाधिक फटका डोंगराळ भागात असलेला मुखेड तालुक्याला बसला आहे कापसाच्या उत्पन्नातून उत्पादन खर्च निघत नसल्याने पाहून हतबल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अक्षरा उभ्या कापसाच्या पिकाला चरण्यासाठी जनावरे सोडले आहेत तर काही शेतकरी उभी कापणी कुठून टाकून देत आहेत अचानक आलेल्या संकटामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे यंदा बोंड आळी ने आक्रमण केल्याने च नोव्हेंबर महिन्यात पांढरा सोन्याची नासाडी झाली आहे यामुळे ऐन दिवाळीमध्ये कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे शासनाने शेतकऱ्यांच्या मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे

anews Banner

Leave A Comment