• Home
  • *आजअखेर 35 हजार 226 जणांना डिस्चार्ज*

*आजअखेर 35 हजार 226 जणांना डिस्चार्ज*

*आजअखेर 35 हजार 226 जणांना डिस्चार्ज*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज )*

कोल्हापूर जिल्ह्यातील आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 968 प्राप्त अहवालापैकी 781 निगेटिव्ह तर 181 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (6 अहवाल नाकारण्यात आले) अँन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 285 प्राप्त अहवालापैकी 260 निगेटिव्ह तर 25 पॉझीटिव्ह (92 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 307 प्राप्त अहवालापैकी 217 निगेटिव्ह तर 90 पॉझीटिव्ह असे एकूण 296 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 45 हजार 355 पॉझीटिव्हपैकी 35 हजार 226 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 8 हजार 650 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 296 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड- 10, चंदगड-8, गडहिंग्लज-10, हातकणंगले- 40, कागल-7, करवीर-47, पन्हाळा- 5, राधानगरी-3, शाहूवाडी-7, शिरोळ-17, नगरपरिषद क्षेत्र- 41, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 80 व इतर शहरे व राज्य 20 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा-798, भुदरगड- 1125, चंदगड- 1053, गडहिंग्लज- 1291, गगनबावडा- 130, हातकणंगले-4971, कागल-1556, करवीर-5257, पन्हाळा- 1751, राधानगरी-1179, शाहूवाडी-1215, शिरोळ- 2351, नगरपरिषद क्षेत्र-6971, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 13 हजार 732 असे एकूण 43 हजार 380 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 975 असे मिळून एकूण 45 हजार 355 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 45 हजार 355 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 35 हजार 226 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 479 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 8 हजार 650 इतकी आहे.

anews Banner

Leave A Comment