• Home
  • *शारिरीक , मानसिक त्रासाला* *कंटाळून विवाहितेची आत्महत्या*

*शारिरीक , मानसिक त्रासाला* *कंटाळून विवाहितेची आत्महत्या*

*शारिरीक , मानसिक त्रासाला* *कंटाळून विवाहितेची आत्महत्या*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी (जयसिंगपूर) येथील विवाहितेची
मुलबाळ होत नाही म्हणून नवऱ्याकडून होत असलेल्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून  विवाहितेने आत्महत्या केली. सदर घटना चिपरी (ता.शिरोळ) येथील बेघर वसाहतीमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून रेखा भिकाजी कुंभार (वय २८) असे या मयत महिलेचे नाव आहे.पती भिकाजी जयसिंग कुंभार (रा. मुळगाव भुमकरवाडी ता.भुदरगड सध्या रा.चिपरी बेघर) याला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत जयसिंगपूर पोलीसांतुन मिळालेली अधिक माहिती अशी, रेखा व भिकाजी यांचा सन २०११ ला विवाह झाला होता. विवाहानंतर बरेच वर्षे रेखा हिला मुल होत नसल्याने यांच्यात सतत भांडण होवू लागल्याने सन २०१३ रोजी इचलकरंजीत न्यायलयात घटस्फोट झाला. त्यानंतर भिकाजी यांने पुन्हा पत्नी रेखा हिचे मनपरिवर्तन करुन गेल्या पाच वर्षापासून जयसिंगपूर येथे एकत्र संसार सुरु होता. त्यानंतर पुन्हा मुलबाळ होत नसल्याने वाद सुरु झाला होता. पती भिकाजी याच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन राहत्या घरी रेखा हिने गळफास घेवून आत्महत्या केली. जयसिंगपूर पोलिसांनी पती भिकाजी यांला अटक केली असून याबाबत मीना श्रवण कुंभार (वय ४० राहणार रेंदाळ, तालुका हातकणंगले) यांनी फिर्याद दिली आहे .अधिक तपास जयसिंपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

anews Banner

Leave A Comment