• Home
  • 🛑 पुण्यातील गुन्हे शाखेचा विस्तार 🛑

🛑 पुण्यातील गुन्हे शाखेचा विस्तार 🛑

🛑 पुण्यातील गुन्हे शाखेचा विस्तार 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचा विस्तार करत त्याचा विस्तार करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नव्या आयुक्तांनी गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नव्या पद्धतीने हा विस्तार करत गुन्हे शाखा मजबूत केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज हा विस्तार केला आहे.
अशी आहे नवी गुन्हे शाखा…

पोलीस आयुक्त —
अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा

त्यानंतर दोन पोलीस उपायुक्त. त्यात एक गुन्हे शाखा व आर्थिक व सायबर गुन्हे शाखा (आवसा)
त्याखाली सहायक पोलीस आयुक्त 3 असणार आहेत. त्यात एक व दोन गुन्हे शाखा व तिसरा आवसा

सहाय्यक आयुक्त – I
प्रशासन
युनिट-1
युनिट-2
युनिट-3
अमली पदार्थ विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहन चोरी पथक
पीसीबी
एमओबी व प्रतिबंधक

सहाय्यक आयुक्त – II

युनिट 4
युनिट 5
खंडणी विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहनचोरी पथक
भरोसा
सेवा माध्यम प्रणाली
तपास व अभियोग सहाय्य कक्ष

सहाय्यक आयुक्त तीन (आर्थिक गुन्हे शाखा)
सायबर पोलीस ठाणे
संगणक विभाग
कॉप्स एक्सलन्स विभाग

* बदल करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या पुनर्ररचनेत म्हत्वाचा सामाजिक सुरक्षा विभाग थेट पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेच्या एकच्या अंडर काम करणार आहे. तसेच त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण विभाग देखील उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे.

* एमओबी व प्रतिबंधक विभाग एकत्रित काम करणार आहे. तसेच तपास अभोयोग विभाग देखील एकत्रित काम करतील…⭕

anews Banner

Leave A Comment