Home Breaking News बीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोना विषयी जनजागृती.

बीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोना विषयी जनजागृती.

141
0

बीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोना विषयी जनजागृती.
बीड,(प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
बीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी आपल्या स्वखर्चातून तीन महिन्यापासून कोरोना विषयी
जनजागृती करत आहेत .ज्या ठिकाणी
गर्दी असेल त्या ठिकाणी अचानक
सुरुवातीला शिट्टी वाजून लोकांच्या नजरा आपल्याकडे खेचणारे किसान
पुत्र श्रीकांत गदळे हे डोक्यावर टोपी,आणि तोंडावर मास्क, हातात सॅनिटायझर, अंगात कोरोना विषय माहिती देऊन जनजागृती करत आहेत स्लोगन असलेला नेहरू शर्ट कोरोना विषयाची माहिती गेल्या काही महीण्या पासून बीड जिल्ह्यामध्ये स्वखर्चाने माहिती देण्याचे कार्य करत आहेत. रस्त्यावर थुंकू नका. फिजिकल डिस्टन्स ठेवा. पुनर्जन्म नाही. घरीच रहा स्वस्थ रहा जगा आणि जगू द्या .केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. मागील तीन महिन्यापासून कोरोनाची स्वखर्चाने माहिती देऊन जनजागृती करत आहे. बीड जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा, गल्ली असे लोकांची गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणी, निवडून तो निरक्षर लोकांना कोरोना विषय माहिती देऊन स्वतःंची काळजी कशी घ्यावी .याबाबत माहिती देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. कामानिमित्त घराच्या बाहेर पडा .गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा .मास्कचा वापर करा. पुनर्जन्म नाही. त्यामुळे दुसऱ्याला जगू द्या स्वतः जगा असे या तरुणाचे लोकांना आव्हान असते. निरीक्षणासाठी पुढे आलो सर्दी, खोकला हे अजार सुद्धा एकमेकांच्या सहवासात आल्यावर होतो. त्याचप्रमाणे कोरोणाचा सुद्धा सर्दी खोकल्यापासून अजार पसरतो.

त्यामुळे प्रत्येकाने आज पासुन काळजी घेण्याची वेळ आली. असून ग्रामीण भागात अजूनही पोरांना, निरक्षर लोकांना फारशी माहिती नाही. त्यांना माहिती मिळावी म्हणून मीही जनजागृती करत आहे.

Previous article🛑 १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही :- छत्रपती संभाजीराजे 🛑
Next article*विवाहित पीडितेचा सी.आर.पी.एफच्या जवानाकडून हुंड्यासाठी अमानुष असा छळ* *खून करण्याचा डाव अखेर फसला*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here