Home Breaking News 🛑 १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही :- छत्रपती संभाजीराजे 🛑

🛑 १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही :- छत्रपती संभाजीराजे 🛑

94
0

🛑 १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही :- छत्रपती संभाजीराजे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. 9 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला होता.या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिला होता.

मात्र सध्या खासदार संभाजीराजे महाराष्ट्र बंद घोषणे संदर्भात समाधानी नाहीत. याबाबत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, माझा महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही, कोरोनाचा संसर्ग आहे. त्यामुळे बंद नकोच, बंद पुकारणारे मराठा समाजातील नेते नाहीत. त्यांच्या बंदला मराठा समाजातून पाठिंबा नाही, महाराष्ट्र बंद करुन काही फायदा होईल का? मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा निकाल असतो, तो मान्य करावा लागतो. स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज दुखी आहे असं त्यांनी म्हटलं आहे…

तसेच सुप्रीम कोर्टाकडून मराठा आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोवर समाजाला ईडब्ल्यूएसचं १० टक्के आरक्षण घ्यावं असं मंत्री अशोक चव्हाणांनी मला फोन करुन सांगितले. परंतु यास आम्ही नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली. EWS आरक्षण एका जातीसाठी नाही, ते सर्व खुल्या प्रवर्गासाठी आहे.

जर हे आरक्षण घेतले तर सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा कोणताही दावा राहणार नाही म्हणून मी त्यांना EWS आरक्षण घेणं धोक्याचं असल्याचं सांगितलं अशी माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली……⭕

Previous article*एस.टी.कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार*
Next articleबीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोना विषयी जनजागृती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here