• Home
  • *एस.टी.कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार*

*एस.टी.कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार*

*एस.टी.कर्मचाऱ्यांना लवकरच थकीत वेतन मिळणार*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

महाराष्ट्राची लोकवाहिनी एस.टी.महांमडाळीची एसटी.बस कोरोना महामारी संकटाच्या लॉकडाउनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेली राज्याची लालपरी अर्थात एस.टी. बस वेगाने धावू लागली आहे. मात्र, गेल्या तिन महीन्या पासुन पगार थकल्यामुळे एसटी कर्मचारी हवालदील झाले आहे. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरून दिली आहे.
‘एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले.
कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.’ असं परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्याचबरोबर, ‘उरलेले पगारही लवकरच दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजित पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

anews Banner

Leave A Comment