• Home
  • *उत्स्फूर्तपणे बंद* *सटाणा शहरात चार दिवस जनता कर्फ्यू*

*उत्स्फूर्तपणे बंद* *सटाणा शहरात चार दिवस जनता कर्फ्यू*

*उत्स्फूर्तपणे बंद*
*सटाणा शहरात चार दिवस जनता कर्फ्यू* सटाणा (जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
सटाणा शहरातील सर्व नागरिक व व्यापारी बंधूंना कळविण्यात येते की, सध्या कोविड विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून आपल्या सटाणा शहरात लागण सिद्ध रुग्णाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे, त्यामुळे दुर्दैवी मृत्यू प्रमाण वाढत आहे, अशा परिस्थितीत कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी व साखळी तोडण्यासाठी *सटाणा* *शहरात मंगळवार, बुधवार,गुरुवार आणि शुक्रवार म्हणजेच दि. *२५,२६,२७* *आणि *२८* *ऑगस्ट* *२०२०* *रोजी* *उस्फुर्तपणे बंद* *करण्यात येणार आहे* .**
सदर बंद बाबत शहरातील सर्व आजी माजी नगराध्यक्ष, सर्व पक्षीय नगरसेवक, विविध संघटना, सर्व पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी संघटना व पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
या मध्ये औषधांची मेडिकल दुकाने सकाळी ९ ते ४ या वेळेत सुरू राहातील, या व्यतिरिक्त सर्व किराणा,कृषी, भाजीपाला,फळ विक्री, दूध, कापड, सलून, सराफ, हार्डवेअर, आदींसह सर्व व्यवहार आणि व्यवसाय बंद राहतील याची नोंद घ्यावी.
आपल्या शहरातील कोविड ची
साखळी तोडण्यासाठी सर्वांनी या बंद मध्ये सहभागी होऊन कोरोना ला हरवू या!!!!
उत्स्फूर्तपणे बंदच्या कालावधीत पोलिस प्रशासन कडकपणे नियमांची अंमलबजावणी करणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी.

anews Banner

Leave A Comment