Home उतर महाराष्ट्र काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा

काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा

56
0

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0020.jpg

काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा                        अहमदनगर,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तर फिर्यादीच्या पत्रकार असलेल्या भावाने बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सुरेश थोरात यांसह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने घटनेतील सत्य मात्र पोलीस तपासात पुढे येईल.

दोन दिवसांपूर्वी स्वानंद चत्तर नावाच्या स्थानिक वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात पोस्ट केल्यावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सुरेश थोरात यासह 60 जणांनी घरी येत आम्हाला धमकी दिल्याची फिर्याद पत्रकार स्वानंद चत्तर याचा भाऊ विवेक चत्तर याने दिली. हातात कुऱ्हाडी घेऊन व डोक्याला बंदूक लावत आम्हाला धमकी दिली असून, मी बाहेर असताना हा प्रकार सुरू असल्याने मी घरी आल्यावर हे सगळं घडलं अशी फिर्याद विवेक चत्तर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

Previous articleरामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी
Next articleआनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here