Home रत्नागिरी आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी

आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी

158

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0019.jpg

आनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : शहरातील श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये बालचमूनी दहीहंडी साजरी केली. नटून थटून आलेल्या राधा, कृष्णाच्या वेषातील विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात विद्यार्थ्यांनी फेर धरला. कृष्णगीतावर नृत्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकप्रतिनिधीचे व सर्व पालकांचे सहकार्य लाभले.

गेली अनेक वर्षे श्रीमती आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरमध्ये हिंदू संस्कृतीमधील सर्व सण साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांवर सणांचे संस्कार लहान वयापासून होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बालकमंदिरातील बालदोस्त या साऱ्याचा आनंद लुटत आहेत. लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धासुद्धा बालकमंदिरात घेण्यात येते. आषाढी वारी, दहीहंडी, गणेशोत्सव यासह नवरात्रोत्सव, दीपावली असे विविध उत्सव साजरे केले जात असून पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.