Home रत्नागिरी रामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी

रामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0012.jpg

रामपेठ अंगणवाडीत दहीहंडी साजरी                       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रामपेठ अंगणवाडीमध्ये, बालगोपाल दहिहंडी कार्यक्रम साजरा झाला. या कार्यक्रमासाठी संगमेश्वर गावचे उपसरपंच श्री विवेक शेरे ग्रामविकास अधिकारी श्री संजय शेलार, ग्रां पं.सदस्य प्रतिक्षा शेरे, मानसी अंब्रे, ग्रा. सं. अध्यक्ष सौ.प्रिया सावंत, शाळा व्यवस्थापन कमिटी सं नं. 2 सदस्य सौ. मयूरी रहाटे – श्री कुणाल शेट्ये, सामाजिक कार्यकते श्री दिनेश अंब्रे तसेच पालक, ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. प्रथम सर्व मान्यवरांचे अंगणवाडीच्यावतीने स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी ग्रा.वि. अधिकारी शेलार यांनी मुलांना लाडू वाटप केले. तसेच पालक प्रतिभा चिचकर यांनी मुलांना जिलेबी वाटप केले, तर बाळकृष्ण कुसाळकर यांनी मुलांना फळवाटप केले.

अंगणवाडीतील काही विद्यार्थी राधा तसेच श्रीकृष्ण, गोविंदा यांची वेशभूषा करून मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच यावेळी अंगणवाडीत महिलांसाठी कार्यक्रम झिम्मा, फुगडी, दांडिया असे खेळून मोठया उत्साहाने दहीहंडी साजरी करण्यात आली. शेवटी अंगणवाडी सेविका. सौ. पल्लवी सचिन शेरे तसेच मदतनीस सौ. शितल दिनेश अंब्रे यांनी आभार मानले.

Previous articleसंगमेश्वर भडकंबाच्या हर्षराज शिंदेचे C.B.S.E. दहावी मध्ये उल्लेखनीय यश
Next articleकाँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here