Home Breaking News *हमी भावाने खरेदी केलेल्या मक्याचे पेंमट त्वरीत अदा करण्यात यावी स्वाभिमानी शेतकरी...

*हमी भावाने खरेदी केलेल्या मक्याचे पेंमट त्वरीत अदा करण्यात यावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी*

69
0

*हमी भावाने खरेदी केलेल्या मक्याचे पेंमट त्वरीत अदा करण्यात यावी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी*

सटाणा, (जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क))
कसमादे दि. २० ऑगस्ट – तीन चार महिन्यांपुर्वी नाशिक जिल्ह्यातील मका उत्तपादकांनी हमी भावापेक्षा ही ज्यादा दराने म्हणजे २००० ते २१०० रुपये क्किंटल प्रमाणे विकला जात होता ,परंतु तिन चार महिन्यां पुर्वि आलेल्या कोरोणा महा मारीच्या संकटामुळे राज्य व जिल्ह्याच्या सिमा बंद झाल्या मुळे संपूर्ण कसमादे पठ्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्या लॉकडाउन केला गेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व मका बाहेर जात नव्हता त्यामुळे मक्याचे भाव पडुन ते एकदम १००० ते ११०० रुपया पर्यंत खाली आले त्यामुळे मका उत्तपादकांचे तोंडाचे पाणी पळाले होते ,मधल्या काळात केंद्र सरकारने अन्न आणि पुरवठा विभागा अंतर्गत हमी भावाने मका ,व ज्वारी ( दादर ) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता , त्यानुसार केंद्र व राज्य सरकार मिळुन अनेक अडथळे पार करत २५,००० ह.टन मका खरेदी करण्यास आली , परंतु नाशिक जिल्ह्यात खरिप व रब्बी हंगामातील एकुण उत्पादन लाखो क्किंटल मध्ये उत्पादित झाल्यामुळे शिल्लक मक्याचे काय करायचे हा प्रश्र्न शेतकंऱ्याना पडला होता शेतकंऱ्याना दिलासा
देण्यासाठी पालक मंत्री छगण भूजबळ व खा ,भारती पवार यांनी प्रयत्न करून खरेदीची मुदत वाढवून , क्षमताही वाढुन दिली त्यामुळे जास्तीत जास्त हमी भावाने मका खरेदी करण्यास मुभा मिळाली होती , मका उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचनिनां सामोरे जात आपला मका तर दिला परंतू दोन ,तिन महिने उलटून ही अध्याप पर्यंत खरेदी करण्यास आलेल्या मक्याचं पेंमट अदा न झाल्याने शेंकडों मका उत्पादक हवालदिल झाले आहेत ,ते रोज शासकीय अधिकाऱ्यांना फोन द्धारे संपर्क साधत असुन त्यांचे कडुन समाधान कारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत , मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना फोन वरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की , नाशिक जिल्हयात एकुण ९७,२१९ क्किंटल मका खरेदी करण्यात आला असुन त्या साठी १६ कोटी ३५ लाख ९१ हजार रुपये लागणार आहेत , त्यापैकी फक्त एक कोटी अदा करण्यात आले आहेत , बाकीची उर्वरीत रक्कम अद्याप मार्केटिंग फेडरेशन कडुन उपलब्ध झाल्यावर अदा करण्यात येणार असल्याचे समजते , तेवढ्या महीन्या दिड महीन्यात नविन मका बाजारात उपलब्ध होईल , त्यामुळे मागिल वर्षाच्या पिकाचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे ,तरी केंद्र व राज्य शासनाने खरेदी केलेल्या मक्याचे पेंमट त्वरित अदा करण्यात यावे ,१५ दिवसाच्या आत सर्व खरेदी करण्यात आले ल्या मक्यांचे पेमेंट अदा न झाल्यास नाशिक जिल्ह्यातील जेथे जेथे खरेदी केंद्र होते तेथे तिर्व आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव ,ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजु शिरसाठ , उपजिल्हा अध्यक्ष सुभाष आहीरे ,कळवण तालुका अध्यक्ष रामक्रुष्ण जाधव , मधुकर पाचपिंडे ,प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष क्रुष्णा जाधव , रमेश बापु आहीरे ,खंडु खैरनार ,संजय निकम , नामदेव नंदाळे ,अशोक आढाव आदी शेतकंऱ्यानि दिला आहे ,,

Previous article*कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक *कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक – श्री. पंकज पवार …*
Next article*ठेगोंडा येथे पोलिस औटपोस्टची मागणी*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here