• Home
  • *कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक *कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक – श्री. पंकज पवार …*

*कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक *कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक – श्री. पंकज पवार …*

*कोरोनापासून गावकऱ्यांचा बचावासाठी राञीचा दिवस करणारा प्रयत्नशिल अवलिया ग्रामसेवक – श्री. पंकज पवार …*
सटाणा,(जयवंत धांडे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
गावाच्या कारभारात स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रशासकीय अधिकारी ‘ग्रामसेवक’ असतो. ग्रामविकासाचा खरा कणा ग्रामसेवक असतो. पण प्रत्येकाच्या काम करण्याच्या पध्दतीवरच गावाचा विकास अवलंबुन असतो.
असाच एक अवलिया ग्रामसेवक श्री. पंकज भगवान पवार होय. बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे हे त्यांचे जन्मगाव. भारतीय सैन्यात प्रथमतः नोकरीला सुरवात केली पण प्रकृती अस्वास्थामुळे ही नोकरी सोडून मुंबई पोलीसमध्ये पुन्हा भरती झालेत माञ मला अधिकारी व्हायचं आहे हे स्वप्न बाळगुन लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा दिल्यात त्यातच ग्रामसेवकची जाहिरात लागली ग्रामसेवक ची परीक्षा उत्तीर्ण झालेत. व मला अधिकारी होण्यापेक्षा तळागाळातल्या जनतेला न्याय देता येईल या हेतून बागलाण तालुक्यातल्या तळवाडे दिगर येथे सेवेला सुरवात केली. तदनंतर मळगाव,पिसोरे, जुने निरपुर, नवे निरपूर, मुंगसे, जोरण, खमताणे, साल्हेर याठिकाणी ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला .
व सध्या मुंगसे व भाक्षी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक म्हणून कारभार बघताहेत. ज्या गावाला बदली झाली त्या गावातील स्मशानभूमीच्या कामापासुन सुरवात करुन गावात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असतो. गावे आदर्श करण्यावर व ग्रामस्वच्छता आभियान राबविण्यावर मोठा भर दिला आहे. सकाळी ७ वा. ग्रामपंचायत कार्यालय स्वतः उघडणारा अवलिया ग्रामसेवक पंकज पवार आहेत. राञी उशिरापर्यंत कामकाज करुन गावातल्या अडचणी स्वतः सोडवल्याशिवाय शांत बसणार नाही. साल्हेर येथे प्रचंड पाणीटंचाईत गावातल्या महिला पायपीट करीत दिड कि. मी. वरुन डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणत होत्या. पंकज पवार यांनी हे बघितले आणि माझ्या जगण्याने मी काय न्याय देऊ शकतो ? याविचाराने स्वतः जाऊन पाण्याचा झरा बघितला व कल्पक बुध्दी वापरुन पी.व्ही.सी पाईपने डोंगराच्या उताराने ते पाणी गावात आणून अनेक वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी लावला. या गावातून बदली झाली तेव्हात्या गावातील माय माऊल्या अक्षरशः रडल्या.
आजही मुंगसे व भाक्षी ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर पंकज पवार अग्रेसर आहेत. सध्या कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. व भारतातही त्याची लागण झाली आहे. देश वाचवण्यावर सगळी यंञणा काम करते आहे . पण माझ्या गावावर हे सावट यायला नको म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी कर्मचाऱ्याची तब्बेत ठिक नाही म्हणून स्वस्थ न बसता स्वतः ट्रॕक्टर चालवून ब्लोअरने फवारणी केली. मी एक अधिकारी आहे हा आव न आणता किंवा आज सण आहे म्हणून कुटुंबियांसमवेत न रमता राञी उशिरापर्यंत फवारणी केली. शिवाय दिवसभर भाक्षी येथे मास्क वाटप करुन राञी उशिरा मुंगसे येथे पोहचुन मुंगसेतील प्रतिबंधात्मक उपाय स्वतः योजून घ्यावयाच्या दक्षता गावकऱ्यांच्या लक्षात आणुन राञी राञी १२वा. घरी पोहचणारा अवलिया ग्रामसेवक पंकज पवार होय. ही महामारी माझ्या गावावर न येवो यासाठी सामाजिक बांधिलकीतून राञीचा दिवस करुन, जर या महामारीने माझ्या गावाला ग्रासले तर मी माझ्या ताकदीने काहिच करु शकलो नाही तर मला जगण्याचा काय अधिकार? हा उदेश ठेऊन सुर्याच्या तेजाएवढे नाही जमणार पण अंधारात एका पणतीचा प्रकाशही पुरेसा ठरतो हा उद्देश ठेऊन होईल तेवढा प्रकाश पेरण्याचे काम माझ्या हातून झाले तर तो विधाता न्याय दिल्यावाचून रहाणार नाही …
गोरगरिबांचे प्रश्न असो की उपेक्षितांच्या अडचणी ह्या जाणून घेऊन स्वतः डोळ्यात पाणी आणून त्या सोडवण्यावर प्रचंड भर देत असतात . माझ्या जगण्याच्या अस्तित्वाने मी काय न्याय देऊ शकतो ? मानवजातीच्या अस्तित्वाच्या या लढाईत मावळा म्हणून खंबिर भुमिका बजावत स्वराज्याचे सुराज्यात व सुराज्याचे ग्रामराज्यात व ग्रामराज्याचे रामराज्यात रुंपातर होण्याला वेळ लागणार नाही .
स्वतःचे ७ अपघात झालेत, त्यात २३ ठिकाणी फ्रॕक्चर, ३ मोठ्या शस्ञक्रिया तरीदेखील वाऱ्याच्या वेगागत एक मिनीटही न थांबता मिळालेल्या बोनस आयुष्याचा हिशोब समाज्याच्या कारणी लागावा यासाठी अहोराञ काम करुन समाज सुखी करण्याच्या प्रक्रियेत पंकज पवारांचा सिंहाचा वाटा आहे.
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी आदरणीय इंद्रजीत देशमुख साहेब यांना गुरु मानुन त्यांच्या विचारधारेवर पंकज पवार हे कार्य करित असतात. शासनाने व सामाजिक संस्थांनी आजवर ६ आदर्श ग्रामसेवक पुरस्कांरानी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment