Home जळगाव चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार… कारमधून आलेल्या पाच हल्लेखोरांचा थरार….

चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार… कारमधून आलेल्या पाच हल्लेखोरांचा थरार….

1028

आशाताई बच्छाव

IMG_20240207_212521.jpg

चाळीसगावात माजी नगरसेवकावर गोळीबार…

कारमधून आलेल्या पाच हल्लेखोरांचा थरार….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव नगरपालिका चे माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळासाहेब मोरे यांच्यवर त्यांच्या रेल्वे स्टेशन जवळ सिंधी कॉलनी शेजारी असलेल्या ऑफिस मध्ये दि 7 रोजी कारमधून आलेल्या पाच जणांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना देवरे हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले होते मात्र पुढील उपचारासाठी नाशिक रवाना करण्यात आले आहे
हल्लेखोर आलेल्या कारमधून पळून गेले. हल्ल्याचे कारण समजून आले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा असा पोलीसांचा कयास आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी नाकाबंदी करत हल्लेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती अशी की, रेल्वे स्टेशन सिंधी कॉलनी येथे बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असतांना आज दुपारी 4-35 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनकडून एका पांढऱ्या कारमध्ये आलेल्या पाच जणांनी मोरे यांच्या कार्यालयाजवळ कार बाजूला उभी करून त्यातून उतरून बाळू मोरे यांच्या कार्यालयात जावून हल्लेखोरांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी चार ते पाच गोळ्या झाडल्याचे वृत्त आहे.
यात महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले. कारमधून आलेले हल्लेखोर शांतपणे त्याच कारमधून नारायणवाडीच्या दिशेने पसार झाले.
महेंद्र मोरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि त्यात ते जखमी झाल्याचे कळताच त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याचे कळते.महेंद्र मोरे यांच्यावर झालेल्या गोळीबाराचे कारण समजून आले नाही