*ठेगोंडा येथे पोलिस औटपोस्टची मागणी*
सटाणा,(जयवंत धांडे तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
*ठेगोंडा हे गाव सटाणा नाशिक या प्रमुख रहदारीच्या हायवेवर आहे ठेगोंडा येथे श्री सिध्दीविनायक गणपती मंदिर आहे श्री गणेश भक्तांना पावणारे देवस्थान असल्यामुळे भक्तांची नेहमी वरदळ अस्ते गणेश चतुर्थीला भक्तांची खूप गर्दी असते श्री गणपती मंदिर रहदारीच्या प्रमुख हायवेवर असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सटाण्याचे पोलीस बंदोबस्तासाठी नेहमी येतात तसेही मंदिर हे गिरणा नदीच्या काठावर आहे गिरणा नदीचे पात्र फार मोठे आहे नदीला नेहमी पाणी असते पावसाळ्यात नदीला पूर पाणी नेहमी कमी जास्त होत असते गिरणा नदी ही शेतकऱ्यांची जीवनदायणी आहे गिरणा नदीच्या काठावरून शेतीसाठी शेतकर्यांनी विहिरी खोदून पाणी नेलेले आहे गिरणा नदीपात्र शेतकऱ्यांना वरदानच होते परंतु नदीपात्रातील वाळूचा उपसा इतका वाढला या दहा वर्षांत विस फुट नदीपात्र खोल झाले त्यामुळे उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही नदी पात्रातील वाळू उपसा बंद करण्या संदर्भात अनेक वेळा राजकारण झाले परंतु वाळू माफियांनी वाळू उपसा बंद केला नाही विषेश म्हणजे पंधरा किलोमीटरवर दोन तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन व तहसीलदार आधिकारी असतांना वाळू माफिया वाळूची तस्करी करतात हे दुर्दैव आहे तसेच या भागात अवैध धंदे जुगार मटका गावठी दारू यांचा सुळसुळाट आहे त्यामुळे ठेगोंडा येथे पोलिस औटपोस्टची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी शासनाकडे ठेगोंडा येथे पोलीस औटपोस्टची मागणी करण्यासाठी पालकमंत्री व पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन वरील निर्णय त्वरित घेण्याची विनंती केली जाणार आहे*
*तसेच प्रत्येक गाव पातळीवर शासनाने तंटामुक्ती समिती स्थापन केली आहे त्याच अनुशंगाने अवैध धंदे व वाळू तस्करी रोखण्यासाठी पोलीस मित्र ही समिती नेमण्यात यावी जे तरुण या कामात सहभागी होतील त्यांना शासनाने ओळख पत्र देऊन नेमनुक करावी व योग्य ते मानधन देण्यात यावे त्यामुळे नक्कीच यावर आळा बसेल मानधन देण्याचा अर्थिक भार शासनाच्या तिजोरीवर न पडता पोलीस मित्रांनी अवैध धंदे व वाळू तस्करी करणाऱ्या लोकांना पकडल्यास पोलिसांनी व तहसील विभागाने दंडात्मक कारवाई करून दंडाच्या रकमेतून पोलीस मित्रांना योग्य ते मानधन द्यावे म्हणजे पोलिस मित्र जोमाने काम करतील त्यामुळे पोलिसांचा व शासकीय अधिकारी यांचा तान कमी होईल व सहकार्य मिळेल*
*आमच्या मागणीचा शासनाने व शासकीय अधिकारी यांनी त्वरित विचार करावा म्हणजे काही तरूणांना योग्य ते काम मिळेल*
