• Home
  • *नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन*

*नांदेड जिल्ह्यातील कोळी समाजबांधवाकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन* देगलूर (संजय कोकेंवार तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नांदेड जिल्ह्यातील बिलोली, नायगाव तालुक्यातील कोळी महादेव, मन्नेरवारलू , व तत्सम जमातीच्या प्रलंबित जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंबंधी अ.भा.आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले .यावेळी व्यंकट मुदीराज( मराठवाडा अध्यक्ष) मारोती पटाईत( बिलोली नगरपालिका उपाध्यक्ष) विजय बाबु सुनप( नांदेड जिल्हाध्यक्ष) इंद्रजीत तुडमे(बिलोली ता. अध्यक्ष)मारोती बिचेवाड(मुदखेड ता. अध्यक्ष) राजकुमार गादगे आदी उपस्थित होते .मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी धर्माबाद व उमरी या तालुक्यातीलही कोळी महादेव, मन्नेरवारलू ,व तत्सम जमातीच्या प्रलंबित जमात प्रमाणपत्र देण्यासाठी उपविभागीय अधिकारी धर्माबाद येथे निवेदन देण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment