आशाताई बच्छाव
न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची देशाचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती दिल्ली,( युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्र सरकाच्या अधिसूचनेनुसार, न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची काल बुधवारी भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती ललित यांना २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ देतील. तसेच ललित ८ नोव्हेंबर रोजी निवृत्तही होतील. त्यांचा कार्यकाळ ७४ दिवसांचा असेल.
२६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश एनव्ही रमना यांनी न्यायमूर्ती ललित यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. सरन्यायाधीश रमना यांनी न्यायमूर्ती ललित यांची ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. दरम्यान बार तसेच खंडपीठातील न्यायमूर्ती ललित हे त्यांच्या दीर्घ आणि समृद्ध अनुभवाच्या जोरावर न्यायसंस्थेला अधिक उंचीवर नेतील, असा विश्वासही रमना यांनी व्यक्त केला.
९ नोव्हेंबर १९५७ रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती यू यू ललित यांनी जून १९८३ मध्ये वकील म्हणून नावनोंदणी केली होती. मुंबई उच्च न्यायालयात दोन वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर ते जानेवारी १९८६ मध्ये दिल्लीला गेले. २००४ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
सरन्यायाधीश म्हणून न्या. यु. यु. लळित यांचा कार्यकाळ हा तीन महिन्यांपेक्षा कमी असणार असून ते नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होतील. देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. एन. व्ही. रामण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यानंतर २७ ऑगस्ट पासून न्या. लळित सरन्यायाधीशपदाचा पदभार स्विकारतील. बारमधून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले न्या. लळित हे दुसरे न्यायमूर्ती आहे. न्या. लळित हे तिहेरी तलाकला बेकायदेशीर व घटनाबाह्य ठरविण्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठाचे सदस्य होते.