राजेंद्र पाटील राऊत
ठाण्यात महापालिका सहायक आयुक्तांना निष्काळजीपणा नडला! महापौरांनी दिले चौकशीचे आदेश ?
ठाणे : (अंकुश नारायण पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज चॅनल)
संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात व कोरोना चे सर्व बंधने पाळत गणपती विसर्जन करण्यात आले होते. परंतु ठाण्यात पालिकेचे सहायक आयुक्त यांचा निष्काळीपणामुळे या पवित्र सणाला, गालबोट लागले आहे. तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
उपवन तलावात विसर्जित केलेल्या गणेश मूर्ती ह्या टाळावा बाहेर का कचऱ्यात फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. या संधर्भात गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून वर्तकनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गणेश विसर्जनासाठी पालिकेने कृत्रिम तलाव निर्मिती केली होती व सर्व गणेश मूर्ती ह्या विधीवध तलावात विसर्जन करण्याची जबाबदारी एका ठेकेदाराला देण्यात आली होती. परंतु आता गणेश मूर्ती तलावातून कचऱ्यात कशा आल्या हा बाबत ठेकेदाराला व संबंधित सहायक आयुक्त यांना महापौर नरेश म्हस्के यांनी जबाबदार असल्याचे सांगितले आहे.
महापौर नरेश म्हस्के यांनी त्यांचा दालनात प्रशासन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले त्यानंतर संबंधित प्रकरणी पालिका प्रशासन यांनी सहायक आयुक्त श्री.बोरसे यांना सविस्तर खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.