Home विदर्भ १५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई

88
0

राजेंद्र पाटील राऊत

१५२ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क
आतापर्यंत २३९४३ व्यक्तिं विरुध्द कारवाई
नागपूर, ता.१६ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी (१५ डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार १५२ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २३९४३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,०३,३०,५००/- चा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असले तरी कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.
मंगळवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २३, धरमपेठ झोन अंतर्गत ३०, हनुमाननगर झोन अंतर्गत ८ धंतोली झोन अंतर्गत ११, नेहरुनगर झोन अंतर्गत १७, गांधीबाग झोन अंतर्गत ८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १२, लकडगंज झोन अंतर्गत १०, आशीनगर झोन अंतर्गत १५, मंगळवारी झोन अंतर्गत १३ आणि मनपा मुख्यालयातील ५ जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १८४७३ बेजबाबदार नागरिकांकडून रु ९२ लक्ष ३६ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे. युवा मराठा न्युज नेटवर्क

Previous articleचंद्रपूर शहर महानगरपालिकेत कचरा संकलन घोटाळा
Next articleराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा २०२९ च्या निवडणुकीचा पाया आहे – प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here