आशाताई बच्छाव
धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ- साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील. खोरी गावात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा सह मेघ गर्जना व विजांचा कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पावसाचा परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत असून. असेच नुकसान खोरी गावातील शेतकरी . श्री हिरामण देवमन जावरे.या शेतकरी च्या शेतामध्ये विजेच्या तडाख्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. हताश व निराश झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची अपेक्षा केली. आहे. कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून. शेतकऱ्याला शासनाकडून काहीतरी मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा इतर उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून. खरिप हंगामाची पूर्वतयारी सुरू असून आशा प्रसंगी शेतकऱ्यावर आलेले संकट या संकटातून काढण्यासाठी शेतकऱ्याला शासन स्तरावरून काहीतरी मदत मिळवून द्यावी अशी विनंती प्रसिद्धी माध्यमातून शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली. आहे अशावेळी शासनाची थोडीफार मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा गावकरी व इतरांनी व्यक्त केली आहे. व अजून इतर शेतकऱ्यांचे हाती आलेले कांदा पीक व भुईमूग बाजरी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सतत तीन दिवसापासून सुरू असलेले वादळी वारा पाऊस यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने लक्ष द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे.