Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा,विजय पडून शेतकऱ्यांच्या बैलांचा मृत्यू

साक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा,विजय पडून शेतकऱ्यांच्या बैलांचा मृत्यू

296

आशाताई बच्छाव

1001498480.jpg

धुळे संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ-  साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील. खोरी गावात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास वादळी वारा सह मेघ गर्जना व विजांचा कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली असून अवकाळी पावसाचा परिसरातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसत असून. असेच नुकसान खोरी गावातील शेतकरी . श्री हिरामण देवमन जावरे.या शेतकरी च्या शेतामध्ये विजेच्या तडाख्याने बैलाचा मृत्यू झाला आहे. हताश व निराश झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची अपेक्षा केली. आहे. कृषी अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा करून. शेतकऱ्याला शासनाकडून काहीतरी मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा इतर उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून. खरिप हंगामाची पूर्वतयारी सुरू असून आशा प्रसंगी शेतकऱ्यावर आलेले संकट या संकटातून काढण्यासाठी शेतकऱ्याला शासन स्तरावरून काहीतरी मदत मिळवून द्यावी अशी विनंती प्रसिद्धी माध्यमातून शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केली. आहे अशावेळी शासनाची थोडीफार मदत मिळवून द्यावी अशी अपेक्षा गावकरी व इतरांनी व्यक्त केली आहे. व अजून इतर शेतकऱ्यांचे हाती आलेले कांदा पीक व भुईमूग बाजरी याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सतत तीन दिवसापासून सुरू असलेले वादळी वारा पाऊस यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शासनाने लक्ष द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा प्रतिनिधींकडे व्यक्त केली आहे.

Previous articleतू हिंदू शेरनी आहे” सिंदूर चा उल्लेख करत मा. खा. नवनीत राणा अमरावती यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
Next articleकॅन्डल मार्च काढून अड्याळ येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.