Home भंडारा कॅन्डल मार्च काढून अड्याळ येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

कॅन्डल मार्च काढून अड्याळ येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

129

आशाताई बच्छाव

1001498503.jpg

कॅन्डल मार्च काढून अड्याळ येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

संजीव भांबोरे
भंडारा_ पवनी तालुक्यातील अड्याळ येथे आज दिनांक 12 मार्च 2025 ला सायंकाळी 7.30 वाजता बुद्ध जयंती निमित्त कॅण्डल मार्चचे आयोजन वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ येथून करण्यात येऊन गावातील प्रमुख मार्गाने शांती मार्च काढण्यात आला .सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महाकारुणिक, विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन विनोद बावणे पीएसआय , डॉ स्वप्नील खोब्रागडे, डॉ गणेश मेश्राम, वैशाली बुद्ध विहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,ग्रामपंचायत सदस्य विपीन टेंभुर्णे, कल्पना जांभुळकर ,विकास टेंभुर्णे, सुनील लांजेवार, हिरालाल थंडाईत , अमोल थुलकर या मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील असंख्य बौद्ध उपासक ,उपासिका यांनी कॅण्डल मार्च मध्ये सहभाग घेतला.

Previous articleसाक्री तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा,विजय पडून शेतकऱ्यांच्या बैलांचा मृत्यू
Next articleकोल्हापूरच्या शुक्रवार पेठेतील श्री शंकराचार्य पीठाच्या उत्सवाची सांगता सोमवारी पालखी मिरवणुकीने झाली.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.