Home बुलढाणा डोणगाव-आरेगाव रस्ता की चिखलमय खड्ड्यांचा पट्टा ? – ठेकेदार पळाला, रस्ता अर्धवट...

डोणगाव-आरेगाव रस्ता की चिखलमय खड्ड्यांचा पट्टा ? – ठेकेदार पळाला, रस्ता अर्धवट ! दोन वर्षे उलटली, रस्ता जैसे थे; ठेकेदाराला अभय का?

114

आशाताई बच्छाव

1001497258.jpg

डोणगाव-आरेगाव रस्ता की चिखलमय खड्ड्यांचा पट्टा ? – ठेकेदार पळाला, रस्ता अर्धवट ! दोन वर्षे उलटली, रस्ता जैसे थे; ठेकेदाराला अभय का?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
डोणगाव-आरेगाव रस्ता की चिखलमय खड्ड्यांचा पट्टा ? – ठेकेदार पळाला, रस्ता अर्धवट ! दोन वर्षे उलटली, रस्ता जैसे थे; ठेकेदाराला अभय का?
बुलडाणा :- डोणगाव ते आरेगाव दरम्यानचा रस्ता दोन वर्षांपासून पूर्णत्वास येऊ शकलेला नाही. रस्त्याचे काम सुरू करून ठेकेदाराने तो अर्धवट सोडला. गिट्टी टाकून काम थांबवण्यात आले, मात्र
वेळेअगोदरच गिट्टी निघून मोठमोठाले खड्डे निर्माण झाले आहेत. रस्ता चिखलमय झाल्याने वाहनचालक आणि पादचारी यांचे प्रचंड हाल होत आहेत. हा रस्ता रिसोडला जाण्यासाठी शॉर्टकट मानला जातो, मात्र सध्या त्याची अवस्था “रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ता?” अशीच झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे दोन वर्षे उलटली तरी कामाची साधी सुरुवातही झालेली नाही. या रस्त्यावरून दररोज गजानन महाराज मंदिर, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार विद्या मंदिर, आदर्श विद्या मंदिर येथे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे.
ठेकेदाराने काम सोडून पोबारा का केला? सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याकडे लक्ष दिले जात नाही का? दोन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न झाल्यास नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असे आवाज आता बुलंद होऊ लागले आहेत.

Previous articleमेशी परिसरात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा
Next articleACCIDENT! शंकर भोपळे यांचा अपघाती मृत्यू, तेल्हारा पेठेतील वदनीय घटनेची चौकशी सुरू !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.