Home नाशिक मेशी परिसरात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा

मेशी परिसरात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा

160

आशाताई बच्छाव

1001497213.jpg

मेशी परिसरात अवकाळी पावसाचा व वादळाचा तडाखा
देवळा भिला आहेर तालुका प्रतिनिधी:- मेशी परिसरात आज दुपारी बारा वाजेच्या आसपास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली सुमारे दीड तास चाललेल्या पावसात विजांच्या कडकडाटासह वादळाचा जोरदार तडाखा देखील होता
वादळाच्या जास्त तीव्रतेमुळे मेशी धोबीघाट रस्त्यावर जवळपास आठ ते दहा वीजेचे खांब पडल्याने काही काळ रस्त्यावर वाहतूक थांबली होती वीज कर्मचारी सचिन निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ रस्त्याला अडथळा ठरणारी विजेचे खांब व तारा बाजूला केल्याने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली तसेच पावसामुळे उघड्यावर असलेला गुरांचा चारा भिजला, आंब्याच्या कैऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच काही ठिकाणी शेतात वस्ती करून राहत असलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुला- मुलींचे मांडव असल्याने कार्यक्रमस्थळी चांगलीच धावपळ उडाली
फोटो:- मेशी ता.देवळा येथे अवकाळी पावसाने शेतात साचलेले पाणी ,आंब्याच्या कैऱ्यांचे झालेले नुकसान तर धोबीघाट येथे जोरदार वादळी वाऱ्याने विजेचे तुटलेले खांब रस्त्यावरून बाजूला करतांना वीज कर्मचारी( छाया:- भिला आहेर)