आशाताई बच्छाव
अतनूर येथे सप्ताहाची सांगता
अतनूर / प्रतिनिधी
येथील संजीवन समाधी घेतलेले श्री.घाळेप्पा स्वामी महाराज व ग्राम दैवत श्री.काशी विश्वनाथ महाराज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सोमवारी सांगता झाली. नवनाथ महाराज डोंगरशेळकीकर महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. गुलालाचे कीर्तन ब्रह्मानंद स्वामी महाराज, विश्वनाथ स्वामी महाराज यांनी केले. यानिमित्त दररोज भजन व पहाटे ५ वाजता काकडा आरती, पालखीची गावात पायी दिंडी व मिरवणूक कढण्यात आली. मुख्य बाजार रस्त्यावरून अंबाबाई मंदिर मार्ग परिक्रमा करून भजनी मंडळीच्या हरिनामाच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण गावात फिरून शेवटी श्री.काशी विश्वनाथ महाराज व सजीवन समाधी श्री.घाळेप्पा स्वामी महाराज मंदिरात पालखी आली. कार्यक्रमासाठी विविध समित्या व ग्रामस्थांसह समितीचे अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, उपाध्यक्ष गोविंद येवरे-पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा मुख्य सल्लागार अशोकराव पाटील, प्रकाश पाटील पोलीस पाटील, दयानंद स्वामी महाराज, चंद्रकांत जोशी, नामदेव कोकणे, माधव सोमुसे, किशन मुगदळे, गोविंद कोकणे, खजिनदार बाबूराव पंचगल्ले, माणिकराव साळुंके, दिलीप कोकणे, प्रमोद संगेवार, बाळू कोडगिरे, मारुती गुंडिले, श्रीधर पाटील-गव्हाणे, मनाबाई मधुकर पत्तेवार, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, बाबू कदम, बाबूराव साकोळकर, गुरुनाथ मामा कापसे, महाप्रसादांचे अन्नदाते केशव पाटील माजी सैनिक, सूर्यकांत पांचाळ, प्रा.डाॅ.शशिकांत बिचकुंदे, गावचे सरपंच चंद्रशेखर पाटील, उपसरपंच बाबुराव कापसे, संभाजी पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, साहेबराव पाटील, पत्रकार प्रा.डाॅ.सुधीर पंचगल्ले, प्रा.संतोष बोडेवार, सुरेश बोडेवार, बिचकुंदे, तोंडारे, कापसे, गव्हाणे, येवरे, गायकवाड, वाघमारे, शिंदे, जाधव, आतार, शेख, मुंजेवार, अतनूरकर, ईश्वर कुलकर्णी, जोशी, शिंदे-पाटील, गव्हाणे-पाटील, येवरे-पाटील, सोमुसे-पाटील, युवक मंडळी, अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, सुल्लाळी, डोंगरगाव, देवूळवाडी, मांजरी, अवलकोंडा, कोदळी, व पंचक्रोशीतील हभप, भजनी मंडळ, वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महाराज, महिला, पुरुष भजनी मंडळी व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. या सप्ताहात अतनूरच्या पंचक्रोशीतील नवसाला पावणारा श्री.काशी विश्वनाथन व संजीवन समाधी घेतलेले श्री. घाळेप्पा स्वामी महाराज हजारो भाविक भक्तांच्या हाकेला धावून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात, अशी आख्यायिका १४९ वर्षांपासून आजही सांगितली जाते.