Home मराठवाडा सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद चा विज्ञान शाखेचा निकाल 98. 56, वाणिज्य शाखेचा निकाल...

सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद चा विज्ञान शाखेचा निकाल 98. 56, वाणिज्य शाखेचा निकाल 95 टक्के, कला शाखेचा निकाल 80.91%,.

100

आशाताई बच्छाव

1001480865.jpg

सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद चा विज्ञान शाखेचा निकाल 98. 56, वाणिज्य शाखेचा निकाल 95 टक्के, कला शाखेचा निकाल 80.91%,.
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

जाफराबाद तालुक्यातील सिद्धार्थ महाविद्यालय या मोठ्या महाविद्यालयातून इयत्ता बारावीचा निकाल उत्कृष्टपणे व कायम परंपरेप्रमाणे लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 98.56% लागला आहे, वाणिज्य शाखेचा निकाल 95 टक्के लागला आहे, कला शाखेचा निकाल ८०.९१ टक्के लागला असून ही निकालाची परंपरा कायम आहे. जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. सर्व शाखा मिळून 308विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले होते. पैकी 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेमधून प्रथम तीन विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे प्रथम प्राची बबन मगरे 83.33% द्वितीय सुनील सोनाजी लहाने 79%, तृतीय आईरफ रजिफ पटेल 76.83%, वाणिज्य शाखेत प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे मनीषा संदीप जंजाळ 83.83%, प्रवीण विजय नवले 83.50%, आयुषी राकेश नागरीया 79.17%, कला शाखेतील प्रथम तीन विद्यार्थी प्रथम,आदिती दीपक खरात 83.33 %, वैष्णवी समाधान लोखंडे79.67%, तृतीय शुभांगी गजानन दूंडियार77. 67%, तसेच प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी मध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब मस्के, संस्थेचे सचिव माननीय प्राध्यापक राहुल भाऊ मस्के, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश देशमुख, वरिष्ठ महाविद्यालयाचे व प्राचार्य डॉक्टर सुनील मेढे, डॉक्टर श्याम सर्जे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विनोद हिवराळे, प्राध्यापक वैद्य, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रबंधक सुनील भाऊ मस्के, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश मिरगे, असेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी असंख्य विद्यार्थी आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleमहापालिका, जि.प. निवडणुकांसाठी धुळ्यातील राजकीय पक्ष सज्ज
Next articleBREAKING – चिखलीत चाकू हल्ला – किरकोळ वादातून थरकाप !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.